Posts

Showing posts from 2019

कोसला समीक्षा अणि विश्लेषण || Kosla Book Review & Analysis

Image
कोसला समीक्षा अणि विश्लेषण भटकते भूत कोठे हिंडते? पूर्वेकडे? की उत्तरेकडे. पश्चिमेकडे? की दक्षिणेकडे.  देवाचे अन्न पृथ्वीच्या कोपऱ्याकोपऱ्यात विखुरले आहे आणि तुला  ते खाता येत नाही, कारण तू मेलेला आहेस. ये, हे भटकत्या भूतां, ये.  म्हणजे तुझी सुटका होईल आणि तू  मार्गस्थ होशील.                                             ~ तिबेटी प्रार्थना  माझं आणि कोसलाच असलेलं नातं:      मि त्रांनो, मराठी वाङमयाबद्दल बोलायचं झालं तर माझं इतकं काही फारसं वाचन नाहीये. शाळेत आम्हाला स्टेट बोर्डाने मराठी पाठ्यक्रमात जे शिकवले ते व बाकी सर्व चांदोबा, ठकठक, चंपक व इतर बालमासिकें व दैनिकांमधील सदरे हीच सर्वे माझी मराठी साहित्याशी असलेली ओळख. अधून मधून वडील मला वाचण्यासाठी प्रभोधनकार ठाकरे, डॉ. नरेंद्र दाभोळकर, कॉ. पानसरे अशा मोठ्या मंडळींची पुस्तके आणत असत व तीही मी तितक्याच कुतूहलाने वाचत असत. लहानपणी वा...