YouTubing करताना ।। कसे करावं YouTubing
YouTubing करताना ।। कसे करावं YouTubing तर मित्रांनो मी मागील सहा महिन्यांपासून एक विरंगुळा म्हणून माझं YouTube चॅनेल चालवतोय ज्यावर मी books, comic books आणी video games review करतो. ह्याच बरोबर पाच महिन्यांपासून मी माझा वडिलांचा news oriented चॅनेल सुद्धा चालवत असतो. सध्या मी बघतोय की घरी बसल्या बसल्या माझ्या बऱ्याच मित्रांनी स्वतःचे चॅनेल्स चालू केले आहेत (तब्बल 10जणांनी). त्यात काहींचे चॅनेल inactive आहेत आणि काहींचे नवीनच आहेत. YouTube हा खूप कॉम्प्लिकेटेड प्लॅटफॉर्म आहे आणि तो समजायला खूप वेळ लागतो व त्या मुळेच बरेच जण हताश होऊन हा प्लॅटफॉर्म सोडून जातात. मी माझा सर्व मित्रांचे व्हिडिओस regularly बघतो आणि मला जाणवत की ते बऱयाच गोष्टी कडे दुर्लक्ष करतात ज्यामुळे त्यांचे views जितके नॉर्मली यायला हवेत त्या पेक्षा कमी येतात. ह्या पोस्ट मध्ये त्यांचा ह्या दुर्लक्षित बाबींबद्दल मी बोलेन व ह्यातून काहीतरी उपयोगी माहिती मिळेल अशी आशा करेन. एक गोष्ट मी clear करेन ती म्हणजे माझं चॅनेल हे खूप niche विषयावर आहे सो माझी growth खूप slow आहे. पण माझा वडिलांच चॅनेल हे एका ...