YouTubing करताना ।। कसे करावं YouTubing

YouTubing करताना ।। कसे करावं YouTubing 


तर मित्रांनो मी मागील सहा महिन्यांपासून एक विरंगुळा म्हणून माझं YouTube चॅनेल चालवतोय ज्यावर मी books, comic books आणी video games review करतो. ह्याच बरोबर पाच महिन्यांपासून मी माझा वडिलांचा news oriented चॅनेल सुद्धा चालवत असतो. 



सध्या मी बघतोय की घरी बसल्या बसल्या माझ्या बऱ्याच मित्रांनी स्वतःचे चॅनेल्स चालू केले आहेत (तब्बल 10जणांनी). त्यात काहींचे चॅनेल inactive आहेत आणि काहींचे नवीनच आहेत. 
YouTube हा खूप कॉम्प्लिकेटेड प्लॅटफॉर्म आहे आणि तो समजायला खूप वेळ लागतो व त्या मुळेच बरेच जण हताश होऊन हा प्लॅटफॉर्म सोडून जातात. मी माझा सर्व मित्रांचे व्हिडिओस regularly बघतो आणि मला जाणवत की ते बऱयाच गोष्टी कडे दुर्लक्ष करतात ज्यामुळे त्यांचे views जितके नॉर्मली यायला हवेत त्या पेक्षा कमी येतात. ह्या पोस्ट मध्ये त्यांचा ह्या दुर्लक्षित बाबींबद्दल मी बोलेन व ह्यातून काहीतरी उपयोगी माहिती मिळेल अशी आशा करेन.

एक गोष्ट मी clear करेन ती म्हणजे माझं चॅनेल हे खूप niche विषयावर आहे सो माझी growth खूप slow आहे. पण माझा वडिलांच चॅनेल हे एका healthy way ने ग्रोव होतय तर ह्या अनुभवावरून मी सगळं मांडणार आहे. 

1. Search Engine Optimization (SEO) समजून घ्या

Search Engine म्हणजे Google आणि bing पण

Search Engine Optimization म्हणजे तुमचा कन्टेन्ट किंवा विडिओ ही किती लोकांपर्यंत search केल्यावर पोहोचते आहे.
आपण कन्टेन्ट बनवतोय पण तो लोकांपार्यंत पोहोचत का नाही, मला views का येत नाही असा आपल्याला सुरुवातीला प्रश्न पडतो आणि तो साहजिकच आहे. 
तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही जी विडिओ बनवली आहे त्या सेम विषयावर अजून 2 डझन विडिओ पहिलेपासून आहेत. आणि search मध्ये ह्या मुळे तुमची विडिओ खूप खाली रँक होते. तुमची विडिओ तुम्हाला रँक up करायची असेल तर SEO समजून घ्यावे लागेल. पुढील बरेचशे मुद्दे हे SEO चेच आहेत. 

2. TubeBuddy जोडून घ्या 

ह्यावर मी जमल्यास वेगळा मोठा लेख लिहेन 

सर्वप्रथम TubeBuddy तुमचा चॅनेल अकाउंट शी जोडून घ्या. TeleBuddy हा तुमचा सारथी आहे YouTube करिअर साठी असे समजा. हा अँप फ्री आहे व काही एक रुपया खर्च करू नका ह्या वर. 

3. Title

सगळ्यात मोठं दुःख हेच 

बघा. Title हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे ranking साठी. म्हणून विडिओ बनवण्याचा आधी पाहिले Title बनवा. 
लोकं तुमच्या subject शी related काय शोधत आहे हे बघा. कस बघणार? 
तर YouTube search मध्ये तुमचा टॉपिक type करून बघा. आता जे काही suggestions आले असतील ते लिहून घ्या आणि ह्यात सुद्धा अजून काही नवीन मिळतंय का हे search करून बघा. ह्यानंतर तुमचा विडिओ title finalize करा. 
ह्यातून आता तुम्हाला title तर भेटलाच पण तुमचं competition काय करतय हे ही समजेल. 

4. Tags

Tags Generally 

Tags हे इतके महत्वाचे नाहीत पण कधी कधी ते खूप कामात येऊ शकतात. तर जो तुमचा title आहे किंवा टॉपिक आहे ते सगळं एक दोन चार शब्दांमध्ये tags चा अंडर टाकत जा. 
आता इथे TubeBuddy तुम्हाला तुमचा Tags ची रेटिंग देईल. तुमचे tags किती SEO फ्रेंडली आहे आणि तुमची विडिओ ह्या प्रत्येक टॅग चा अंडर किती रँक ला आहे हे तुम्हाला कळेल. म्हणजेच तो स्पेसिफिक टॅग वर्ड search केल्यावर तुमची विडिओ किती क्रमांकाला येते हे.
मी personally ह्या feature साठी TubeBuddy वर अवलंबून राहतो.

TubeBuddy ने दाखवलेली रँकिंग 


Tags टाकताना हे लक्षात ठेवा की ते hashtags नाहीत सो कमी पण विषयास धरूनच tags टाका.

5. विडिओ डिस्क्रिपशन 

सगळंच cover झालय पहा

टायटल नंतर विडिओ डिस्क्रिपशन हा सर्वात महत्वाचा भाग आहे विडिओ रँकिंग साठी. 
Description कधी पण लांब लचक लिहीत चला आणि तुमचा title आणि tags मधले शब्द ह्या description मध्ये येतील ह्याची काळजी घ्या. तुमचा title मधील शब्द हे तुमचा डिस्क्रिपशन चा पहिल्या 10 शब्दांत असायला हवेत. 
ह्या सगळ्याने तुमची विडिओ system ला relevent वाटून अजून रँक अप होते. 
Description मध्ये hashtags टाकत चला. कधी कधी hashtag मुळे पण traction मिळतो पण टॉपिक running असायला हवा.

6. Thumbnail

Green, Yellow आणि Red कधीही आकर्षक

लक्षात ठेवा लोकांना आजच्या काळात वाचायला वेळ नाही पण बघायला आहे. तुमचा thumbnail हे तुमची विडिओ sell करतो म्हणून जितके सुंदर, रंगीत आणि आकर्षक अशे thumbnail बनवता येतील तितके बनवा. मी माझा thumbnail साठी खूप मेहनत घेतो आणि खूप सुंदर अशे thumbnails बनवतो कारण मला competition पन तितकंच जास्त आहे. On the other hand माझे वडील हे without special thumbnail videos अपलोड करतात आणि ते चालून जात कारण तो news चॅनेल आहे आणि दर एक विडिओ ला thumbnail बनवणं possible नाही. 
पण तुम्ही तुमचा व्हिडिओस ला special thumbnail बनवत चला.

7. LIKES-DISLIKES

जास्त काय आहे हे पहा 

तर सगळं काही बरोबर चालू असत पण कोणीतरी dislike सोडून जात आणि का त्याच कारण पण नाही कळत मग आपल्याला खूप वाईट वाटत. मी स्वतः ह्याचा चांगलाच अनुभव घेतला आहे पण पण एक लक्षात घ्या की Dislikes कामात येतात. 
YouTube AI साठी likes dislikes सारखेच आहेत. ते दोन्ही पन एक प्रकारची reaction आहेत आणि YouTube ला adverts साठी हेच हवे असते. त्या dislike ने फारसा फरक पडत नाही कारण तुम्हाला ऑलरेडी 50-60 likes आलेले असतात आणि dislike पण आला म्हणजे तुमची विडिओ useful आहे पण त्याच बरोबर ती वेगवेगळे reactions पण लोकांकडून घेत आहे.

8. Click-Through Rate (CTR)

आजचा CTR ९. १ %

CTR म्हणजे किती लोकं YouTube Suggestions मध्ये तुमची विडिओ आल्यावर तिच्यावर क्लिक करत आहेत. हा खूप महत्त्वाचा भाग आहे कारण नव्या ऑडियन्स पर्यंत तुमचा चॅनेल ह्याच पद्धतीने पोहोचतो आणि ही संधी घालवू नका. 
ह्याच संधीच सोन होण्यासाठी सुंदर thumbnails बनवा. CTR percentage मध्ये दिसतो आणि एक goal सेट करून ठेवा की तुम्हाला किती CTR achieve करायचा आहे. 
मी माझा व्हिडिओस साठी 10% CTR गोल ठेवतो. मला साधारणतः 7-9 % CTR मिळतो. 

9. Audience Retention Time

छोटी विडिओ = जास्त रिटेंशन 

Audience Retention Time हा खूप महत्त्वाचा पण आपला खुप कमी control असलेला भाग आहे. 
तुमची विडिओ लोकं किती वेळ बघतात आणि कधी exit करतात आहे retention time. 
आपले बरेचशे प्रियजन आपल्या विडिओ ला like देऊन लगेच विडिओ close करतात कारण टॉपिक त्यांचा इंटरेस्ट चा नसतो. ह्याने होते काय की YouTube Algorithm ला वाटते की तुमची विडिओ चांगली नाही कारण लोक लगेच exit करत आहेत. 
ह्या मुळे तुमचा viewers ना विडिओ पूर्ण बघण्यास सांगा. मी अस काही करत नाही म्हणून मला ह्या भागात मार खावा लागतो कारण कितीही झालं तरी लोकं 2-3 मिनिटांत bore होतात. हे मोठ्या मोठ्या YouTubers ना पण सहन कराव लागत म्हणून इतकं विचार करू नका पण ह्याने एक मानत चला की आपल्याला खूप मेहनतीची गरज आहे. 
ह्याच गोष्टीला counter करण्यासाठी बरेच लोक 2-3 minutes ची विडिओ बनवतात आणि त्यांचा views वर लवकर चॅनेल grow करतात. 
ह्यावरून हे पण लक्षात घ्या की कोणालाही जबरदस्ती message करून तुमचे विडिओ जबरदस्ती बघायला सांगू नका. सोप्या पद्धतीने share करत जा.

10. YouTube Analytics बघा

हाच आपला मित्र

तुमचा चॅनेल चा Analytics बऱ्याच गोष्टी सांगून जातात म्हणून आपल्या चॅनेल analytics चा अभ्यास करत जा अधून मधून. 

11. YouTube हा छंद असावा


व्हिडिओस बनवायला मला आवडत म्हणून

YouTube कधीच पैसे कमवायचे ह्या उद्दिष्टाने सुरू करू नका. ह्याने तुम्ही हताश व्हाल.
YouTube हे आपण काहीतरी एक कला, माहिती किंवा शिक्षण पोहोचवण्याकरता करतोय ज्याने कोणाला तरी उपयोग होईल हाच ध्येय बाळगून चला. 
पैसे भविष्यात भेटतील सगळं सुरळीत झालं तर. 
आणि YouTube ही एक grind आहे. वर्ष दोन वर्ष गेली आणि तुम्ही महिन्याला 6-7 विडिओ बनवत असाल तरच तुमचं चॅनेल monetize होईल. 
ह्याला अपवाद आहेत हे नक्कीच पण ते चॅनेल्स खूप hateful, controversial किंवा विनोदी कन्टेन्ट बनवतात म्हणून ते लवकर मोठे होतात. Educational category ला वेळ लागतो. 
एकमेकांना सपोर्ट करा आणि एकत्र मोठे व्हा इतकंच.

Social Media वाला भाग माझा स्वतःचा खूप कच्चा आहे तरी मी हवे असल्यास एका एक्स्पर्ट कडून त्या वर लेख लिहीन. 

तोपर्यंत Happy YouTubing!

Comments

Popular Posts

कोसला समीक्षा अणि विश्लेषण || Kosla Book Review & Analysis

Why you need to watch Asur? || Asur Webseries Review

दयातलोव पास चे रहस्य || Dyatlov Pass Incident in Marathi