लॉक नेस मॉन्स्टरचे रहस्य || The Loch Ness Monster Mystery in Marathi

लॉक नेस मॉन्स्टरचे रहस्य 

The Loch Ness Monster Mystery in Marathi


सूचना: सदर लेख हा स्टिव्ह मॅकग्रेगर यांच्या लेखाचा अनुवाद आहे. 
याच्या वापराचे व छपाईचे सर्व अधिकार स्टिव्ह मॅकग्रेगर आणि अमित भालेराव ह्यांचे आहेत. इतर कुठेही ह्याचा वापर अथवा छपाई आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.


  • प्रस्तावना

लॉक नेस मॉन्स्टर हा आंतरराष्ट्रीय पातळीवर निरंतर चर्चेत राहिलेला विषय आहे. कदाचित लॉक नेस मॉन्स्टरचे रहस्य जगातील जनसामान्यांपर्यंत सर्वात जास्त पोहोचलं गेलेलं रहस्य असावे. लॉक मध्ये वास्तव्यास असलेल्या या रहस्यमयी रहिवास्याची एखादी झलक चुकून आपल्या नशिबी येईल या आशेने दरवर्षी हजारो पर्यटक स्कॉटलंडच्या हायलँड्सना भेट देतात. नेस्सी हा दुसरं तिसरं काही नाही तर भोळसट पर्यटकांकडून पैसे काढण्यासाठी स्कॉटिश पर्यटन एजेंसीसनी रचलेला एक किफायतशीर विनोद आहे या मतावर टीकाकार ठाम आहेत. वर वर जरी या थिअरीवर विश्वास ठेवणे सोयीस्कर वाटत असले तरी एकदा का आपण या प्रकरणातील अतिशयोक्ती व निरर्थक गोष्टी काढून टाकल्या तराही आपल्याला काहीतरी चित्तवेधकसे भेटेल असे मला वाटते. 



लॉक नेस, उत्तरेकडून

या विशिष्ट रहस्याबद्दल बोलण्या अगोदर मला माझी वैयक्तिक रुची जाहीर करावीशी वाटते. गेल्या वीस वर्षांपासून मी लॉक नेसच्या जवळ वास्तव्यास आहे. जरी ह्या लॉक  नेस दंतकथेचा व्यावसायिक नफा मी जाणून असलो तरी काही स्थानिक व जाणत्या लोकांकडून त्यांनी लॉकमध्ये काहीतरी विचित्र पहिल्याचं आमच्या संभाषणांतून मी नोंदल आहे. मला स्वतःला एकदा काहीतरी वेगळं असं येथे नजरेस आलं आहे. यामुळे लॉक नेस मध्ये खरचं एखादा वेगळा प्राणी वास्तव्यास आहे का या प्रश्नाचं माझ्याकडे इतर रहस्यांसारखं म्हणावं तितक वस्तुनिष्ठ उत्तर नाही. याचबरोबर नेसीचं सर्वात पहिलं टिपलेलं छायाचित्रदेखील वेगवेगळ्या दृष्टींनी पाहिल्यास काही नवे पुरावे मिळतील असे मला वाटते. 

माझी वैयक्तिक रुची बाजूला सारून मी ह्या केस कडेही इतर रहस्यमयी केसेस इतकंच वास्तुनिष्ठेने पाहण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन. लॉक नेसमध्ये खरोखर काहीतरी वेगळासा प्राणी राहतो का की नेस्सी ही नॉव्हेल्टी फ्रिज मॅग्नेट व टी टॉवेल्स विकण्यासाठी कुशलतेने रचलेली एक दंतकथा आहे? 
  • घटनेची वस्तुस्थिती 
जर आपणांस लॉक नेस मॉन्स्टरच्या दंतकथेचं मूळ शोधायचं असेल तर आपण वॉटर केल्पि किंवा वॉटर हॉर्स ('Each Uisge'- पाण्यात राहणारी एक मायावी आत्मा) ची कथा आरामात नाकारू शकतो. लॉक नेसमध्ये जुन्या काळापासून कोणी रहस्यमयी प्राणी राहतो याचा पुरावा म्हणून काही लोकं या कथेस मानतात. ही कथा लॉक नेसशी जोडलेली आहे हे खरं परंतु अस जर बघायला गेलो तर स्कॉटलंड मधील प्रत्येक छोट्या मोठ्या तलावासोबत खोल पाण्यात वास्तव्य करनाऱ्या अशा भयावह वॉटर स्पिरिटची कथा जोडलेली आहे. आम्ही सेलटिक लोकं हमेशाच फार अंधश्रद्धाळू राहिलो आहोत आणि हायलँड्सच्या प्रत्येक काना कोपऱ्याशी एखाद्या भुताची किंवा उग्र अथवा चांगल्या आत्म्याची कथा जोडलेली तुम्हाला ऐकायला मिळेल. त्यामुळे लॉक नेसच्या वॉटर केल्पिची कथा काही विलक्षण किंवा वेगळी अशी नाही आणि यामुळे तिला तेथे वर्षानुवर्षे राहत असलेल्या रहस्यमयी प्राण्याच्या वास्तव्याचा पुरावा म्हणून पाहणे चुकीचे ठरेल. 

तरीही, या तत्कालीन रहस्याचा उगम शोधण्यासाठी आपणांस नेस्सीच्या कथेने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळवली तेव्हा म्हणजेच १९३३ च्या आधीच्या काळात जाणे गरजेचे आहे. येथील एकोणिसाव्या शतकाच्या दुसऱ्या अर्धपर्वातील वर्तमानपत्रांत आपल्याला वारंवार एका 'असाधरणपणे मोठ्या व लॉक मध्येच राहत असलेल्या मास्याची' वर्णनं वाचायला मिळतील. या नोंदी येथील मासेमार व वॉटर बेलीफ यांकडून करण्यात आल्या होत्या. काहीतरी विचित्र प्राणी असे वर्णन न करता एक मोठा मासा एवढेच काही यांत प्राण्याचे वर्णन करण्यात आले होते यामुळे या घटनांची कोणी दखल घेतली नाही. छापील स्वरूपात या घटनेशी निगडित सर्वात जुना संदर्भ १८६८ ऑक्टोबरच्या Inverness Courier (स्थानिक दैनिक, जो व्यवसायिकरित्या आजही चालू आहे) मध्ये मिळेल. १८६८ साली या दैनिकात, लॉकच्या किनारी, अब्रिआचन जवळ, एका खूप मोठ्या माशाचे शव मिळाल्याच्या घटनेची बातमी करण्यात आली आहे. "काही वर्षांपूर्वी" लॉक नेस मध्ये पाहण्यात आलेल्या मोठ्या मास्याचेच ते शव असावे असा तर्कही या नोंदीत करण्यात आला आहे. नंतर असे समजले की मेलेला मासा हा खरतर एक चामडी निघालेला डॉल्फिन मासा होता. पण तो नक्की तिथे कसा आला याचे उत्तर कोणाकडेच नव्हते (जवळच असलेल्या मोरेय फर्थ मध्ये डॉल्फिन्स आहेत परंतु लॉकच्या गोड्या पाण्यात त्यांना कोणीही पाहिलं नव्हतं). १८६८ मध्येही लॉकमध्ये कोणतातरी मोठा प्राणी वावरत होता याचे पुरावे मिळत असल्यामुळे ही बातमी महत्त्वाची ठरते. 


नेस नदीवरील पुलांपैकी इन्व्हरनेस मधील एक पुल   

लॉक मधल्या राक्षसाची कथा जनसामान्यांत रुजण्या अगोदर स्थानिक वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झालेल्या आणखी दोन बातम्या मी येथे प्रस्तुत करेन. १९१६ मध्ये एका स्थानिक वृत्तपत्रात लॉकच्या कडेला लागून असलेल्या बालमाकान इस्टेटचा हेडकीपर, बावरलेल्या स्तिथीत दृम्नाद्रोचित हॉटेल मध्ये पोहोचल्याची नोंद आहे. विचारपूस केल्यानंतर त्याने आपण लॉक मध्ये मासेमारी करताना अचानक एक ''मोठा प्राणी" पाण्याच्या वर आपल्या जवळ आला व घाबरलेल्या स्तिथीत आपण लवकरात लवकर किनारा गाठला असे सांगितले. फेब्रुवारी १९३२ मध्ये इनव्हरनेस मधल्या स्थायिक, श्रीमती के. मेकडोनाल्ड या नेस नदीच्या पात्रावरून जाणाऱ्या एका पुलावरून चालल्या होत्या. येथून जाताना त्यांना मगरी सारखा भासणारा एक विचित्र असा प्राणी खालील नदीत दिसला अशी नोंद केली आहे. त्यांनी या प्राण्याचे वर्णन करताना त्याला छोटी मान असलेला, मोठं नाक असलेला, पाठीवर मोठे खवले किंवा प्लेट असलेला आणि डोक्याच्या दोन्ही बाजूस सुळे असलेला प्राणी असे या प्राण्याचे वर्णन त्यांनी केले आहे. यांसारख्याच पण कमी मसालेदार बातम्या वृत्तपत्रांत येतच राहिल्या ज्यांत लॉकमधल्या ओळख न पटलेल्या वस्तू किंवा हालचालींबद्दल वृत्तांत केला जात होता. आणि यानंतर मग शेवटी १९३३ मध्ये सर्वश्रुत आधुनिक नेस्सी दंतकथेचा जन्म झाला.


लॉकच्या उत्तरेकडील बाजूस बांधलेला नवा रस्ता, १९३५ च्या आसपासचे छायाचित्रण 

१९३३ मध्ये घटनांच्या प्रमाणात वाढ होण्याचे एक कारण म्हणजे लॉक जवळून जाणाऱ्या रस्त्यांच्या संख्येत झालेली वाढ. त्यातही उत्तरेकडील बाजूने झालेली रस्त्यांची वाढ. पाहिले येथे फार कमी प्रमाणात पक्के रस्ते जोडलेले होते आणि जेथे चांगले रस्ते होते तेथील झाडांच्या अच्छादनामुळे लॉक दृष्टीस येत नसे. परंतु, १९३३ च्या पूर्वार्धात उत्तरेस झालेल्या पक्क्या रस्त्यांच्या दुरुस्ती व नव्या बांधकामामुळे आता लॉकच्या पसरलेल्या किनाऱ्याला लागूनच लांबचा प्रवास करणे शक्य झाले. या रस्त्यांवरून लॉकचा पृष्ठभाग स्पष्टपणे दिसे. कदाचित यामुळेच (किंवा प्रसारमध्यमात दरम्यानच्या काळात या कथेला मिळालेल्या प्रसिद्धीमुळे) या प्रकारच्या घटनांत १९३३ व त्यानंतरच्या काळात अतोनात वाढ झाली आणि पहिल्यांदाच 'लॉक नेस मॉन्स्टर' हे नाव सामान्यपणे वापरलं जाऊ लागलं. 

या घटनांच्या नोंदी मधील सर्वात पहिली नोंद ही दृम्नाद्रोचित हॉटेलच्या मॅनेजर, श्रीमती एल्डी मॅके यांकडून झाली.  मार्च १९३३ मध्ये या नव्या रस्त्यावरून प्रवास करताना त्यांना एक खूप मोठा, व्हेल सारखा भासणारा प्राणी लॉक मध्ये दिसला. या घटनेची त्यांनी स्वतः काही नोंद केली नाही परंतु ही गोष्ट येथील स्थानिक वॉटर बेलीफ कम पत्रकार, अॅलेक्स कॅम्पबेल यांच्या निदर्शनास आली. त्यांनी मे १९३३ ला इनव्हरनेस कुरिअर या दैनाकाच्या पहिल्या पानावर "लॉक नेस मधील विचित्र नजारा" या मथळ्याखाली एक सनसनाटी लेख प्रकाशित केला. महत्वाचं म्हणजे लॉकशी जोडलेला "राक्षस (monster)" हा शब्द पहिल्यांदा या वृत्तांतात वापरला गेला होता. या आधीच्या वृत्तांतमध्ये सुद्धा "राक्षसी मासा (monster fish)" असं लिहिलं गेलं होतं परंतु खर सांगायचं झालं तर पत्रकारितेच्या दृष्टीने "लॉक नेसचा राक्षस (Loch Ness Monster)" बद्दलची चर्चा ही "लॉक नेसचा मोठा मासा (The Really Big Fish of Loch Ness)" च्या चर्चेपेक्षा अधिक नाट्यमय व चित्तवेधक वाटते. 

१९३३ साली उन्हाळ्यात ब्रिटनच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांकडे इतकं काही रोचक असं नव्हतं व त्यामुळे त्यांनी ह्याच घटनाक्रमांंना उचलून धरलं ज्यातुन तत्कालीन लॉक नेसचा राक्षस किंवा "नेस्सी" ची दंतकथा उदयास आली. नेस्सीची एक झलक पाहण्याच्या आशेने पर्यटक आता लॉकला येऊ लागले आणि यामुळे फोटोग्राफ्स आणि नोंदण्यामध्ये आणखीनच भर पडू लागली. जुलै १९३३ मध्ये दोन पाहुणे , श्रीमान स्पाइसर व त्यांच्या पत्नी लॉकच्या दाक्षिणात्य किनाऱ्या लगत प्रवास करत होते तेव्हा त्यांनी "आयुष्यात आजवर पाहिलेल्या प्राण्यांपैकी सर्वात जास्त ड्रॅगन किंवा तत्सम प्राचीन प्राण्याशी मेळ खाणारा प्राणी" आपणास दिसला असे वृत्तपत्रांशी बोलताना सांगितले. नेस्सी व प्राचीन अर्वाचीन प्राण्यात साधर्म्य असल्याचं सांगणारी हि पहिलीच घटना होती व हे साधर्म्य सर्वानाच आवडले आणि माध्यमांनी या बाबीला उचलून धरले. पुढे जाऊन स्पाइसर दाम्पत्यांनी हेही  सांगितले की त्यांनी नुकताच किंग काँग चित्रपट पहिला होता (UK मध्ये किंग काँग चित्रपट एप्रिल १९३३ ला प्रदर्शित झालेला) व लॉकच्या कडेला पाहिलेला प्राणी या चित्रपटातील डिप्लोडोकसशी साधर्म्य खात होता. 


ह्यु ग्रे च्या १९३३ सालच्या छायाचित्रात काय दिसतंय हे सांगणे जरा कठीणच आहे

सप्टेंबरमध्ये पाच लोकांनी आपण लॉकच्या अल्तसाय कडील भागात एक लांब मानेचा प्राणी पहिल्याच सांगितलं आणि ऑक्टोबरमध्ये अॅलेक्स कॅम्पबेल (ज्या पत्रकाराने राक्षसाचा पहिला वृत्तांत लिहिला होता) यांनी फोर्ट ऑगस्टसच्या जवळ प्लेसिओसॉर सारखा दिसणारा लांब मानेचा प्राणी पाहिल्याचे छापले. या दोन घटनांमुळे नेस्सी हा प्राचीन काळातील तग धरून राहिलेला प्राणी असावा या तर्काला आधार मिळाला. नोवेंबर १९३३ मध्ये ह्यू ग्रे, या स्थानिक इसमाने या राक्षसाचे पाहिलं छायाचित्र टिपल्याचा दावा केला आणि या छायाचित्रास बरीच प्रसिद्धी सुद्धा मिळाली परंतू त्यात स्पष्ट अशे काहीच दिसत नव्हते. यानंतर एप्रिल १९३४ मध्ये मूळ लंडनचे रहिवासी असलेले एक शल्यविशारद, श्री. केनेथ विल्सन, यांनी हायलँड्स मध्ये सुट्ट्या घालवत असताना एक छायाचित्र टिपले. या छायाचित्रात आतापर्यंत सांगितल्याप्रमाणे प्लेसिओसॉर सारखा दिसणारा लांब मानेचा प्राणी दिसत होता. पुढे हे छायाचित्र जगात सुप्रसिद्ध झाले व विसाव्या शतकातील 'आयकॉनिक' छायाचित्र बनून गेले. या छायाचित्राला ''सर्जनचे छायाचित्र (Surgeon's photograph)'' म्हणून ओळखले जाते. सर्जनच्या छायाचित्रामुळे नेस्सी हा लुप्त होण्यापासून वाचलेला एक डायनोसॉर आहे असा समज लोकांच्या मनात आणखीनच घट्ट बसला. रुपर्ट टी. गुल्ड यांनी १९३४ साली द लॉक नेस मॉन्स्टर अँड अदर्स हे पूर्णपणे नेस्सी या विषयावर आधारित जगातील सर्वात पाहिलं पुस्तक प्रकाशित केलं (नेस्सी एक उभयचर प्राणी असावा असा निष्कर्ष गुल्डने या पुस्तकात काढला परंतु त्याची डायनोसॉर असण्याची शक्यता सुद्धा त्यांनी नाकारली नाही).


सर्जनच्या छायाचित्राचे बऱ्याचश्या प्रतिकृती या क्रॉप आणि एनलार्ज केलेल्या आहेत. हा खऱ्या छायाचित्राचा काही भाग ज्यात विरुद्ध बाजूकडील किनाराही दिसतो. याप्रकारे ह्या छायाचित्राकडे पाहिल्यास हा "राक्षस" जरा लहानच  दिसतो. 

यापुढील काही वर्षांमध्ये नेस्सी दर्शनाच्या खबरी वाढल्या व त्यात या दावा केलेल्या राक्षसाच्या इतर छायाचित्रांची व फिल्म्सची भर पडली. या विषयावर बरीच पुस्तके लिहिली गेली, वृत्तपत्रे व मासिकांत असंख्य लेख लिहिले गेले, दूरचित्रवाहिनींवर कार्यक्रम बनले आणि लॉकमध्ये काय आहे किंवा काय राहतं याचा शोध घेण्यासाठी बऱ्याचश्या मोहीमाही राबवल्या गेल्या. यात तार्किक व शास्त्रीय पद्धतीच्या शोधमोहीमांपासून (१९८७ साली ऑपरेशन डिपस्कॅन पार पडलं ज्यात मोठ्या प्रमाणात SONAR स्कॅन चा वापर करून लॉकमध्ये मोठ्या प्राण्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला गेला) ते अगदी खुळचट शोधमोहिमांचाही (आजवर खूप काही बुवा बाबा व जादूटोणा करणाऱ्या गटांनी लॉकला येऊन नेस्सीशी मानसिक संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे) समावेश आहे. हे इतके सारे नेस्सी दर्शनचे किस्से, छायाचित्रे, फिल्म्स आणि शोधमोहीमा यांत एक गोष्ट साधारणपणे पाहायला मिळते ती अशी की त्यांपैकी कोणीही लॉकमध्ये एक असाधारणपणे मोठा असलेला प्राणी राहतो याचा पक्का, स्पष्ट व अंतिम असा पुरावा अजूनही  दिलेला नाही. 

१९५५ मध्ये काढलेल्या मॅकनॅब छायाचित्र दोन कुबड उर्कहार्ट कॅसल च्या बाजूने चालले आहेत असे दाखवतो. 

मला या वेगवेगळ्या छायाचित्रांवर व फिल्म्सवर वेळ घालवायचा नाही पण तरीही प्रसिद्ध असलेल्या काहींचा मी इथे उल्लेख करेन. ह्यू ग्रे व सर्जन यांच्या छायाचित्रांबरोबरच ल्याकलन स्टुअर्ट (१९५१), पी. अ. मॅकनॅब (१९५५) आणि पीटर ओ'कॉनर (१९६०) याच्याही छायाचित्रांचा नेस्सीचं छायाचित्र टिपल्याचा दावा कारण्याऱ्यांमध्ये समावेश आहे.  सुरुवातीला या तिन्ही छायाचित्रांना खरं मानलं गेलं पण हे तिन्हीही बनावट असल्याचं आता निश्चित झालं आहे. १९६० साली, इंजिनीयर टीम डीसडेल हे या राक्षसाचा शोध घेण्यास गेले असताना त्यांनी एक चार मिनिटांची फिल्म बनवली ज्यात हा प्राणी लॉकमध्ये पोहताना दिसत असल्याचा दावा त्यांनी केला. परंतु, या १६ मिमीच्या चित्रफीतीत डिसडेल यांच्या दाव्याला दुजोरा देणारे तपशील यात म्हणावे तितके स्पष्ट दिसत नव्हते. "द अकॅडेमी ऑफ अप्लाईड सायन्सेस" ने रॉबर्ट राईन्स यांच्या मार्गदर्शनाखाली १९७२ साली एक अंडरवॉटर कॅमेरा सोडला ज्यातून ''ऱ्होम्बोइड फिन" म्हणून परिचित असलेलं छायाचित्र काढलं गेलं. काहींनी यात प्लेसिओसॉर सारख्या प्राण्याचा फ्लिपर (पंख) दिसत असल्याचा दावा केला. पुढे असे समजले की या छायाचित्राला इतकं 'एनहान्स' केलं गेलं होत की पाण्यात काढलेल्या खऱ्या छायाचित्रात असा कोणत्याही प्रकारचा फ्लिपर दिसत नव्हता. याच बॅच मधील इतर छायाचित्रांमध्ये डोकं व मन दिसत असल्याचं बोललं गेलं होत परंतु अधिक बारकाईने पाहिल्यावर तो लॉकच्या तळाला पडलेला लाकडाचा तुकडा होता असे निष्पन्न झालं. 
 

वरील बाजूचं छायाचित्र हा एनहान्स ऱ्होम्बोईड फिन फोटोग्राफ आहे. खालील छायाचित्र अंडर वॉटर कॅमेऱ्याने टिपलेलं एनहान्स करण्या अगोदरच खरं छायाचित्र आहे.   

१९७७ साली एक सायकिक कलाकार, भगत व आशेने व्यवसायिक राक्षसाचे शिकारी असलेले ऍंथोनी 'डॉक' शिल्स यांनी उर्कहार्ट कॅसल जवळ तळ ठोकलं असताना आश्चर्यकरित्या राक्षसाच्या डोक्याचे व मानेचे एक सुस्पष्ट आणि रंगीत असे छायाचित्र टिपले. या छायाचित्राच्या नंतर झालेल्या विश्लेषणात पाण्यातील तरंग डोक्याच्या आरपार जात असल्याच दिसत होतं यावरून काही लोकांनी हा प्राणी पॅरेलल रिऍलिटी मध्ये अस्तित्वात असल्यामुळे तो आपल्या जगात अर्ध पारदर्शक दिसत असावा असे बांध बांधण्यास सुरुवात केली तर शहाण्या माणसांनी कदाचित हे पाण्याचे छायाचित्र काढून त्यावर प्राण्याचे चित्र रंगवून या कंपोझिट इमेज चा पुन्हा फोटो काढला गेला असावा असा तर्क लावला. काही काळानंतर शिल्सने हा फोटो खरा असून आपण स्वतः या नेस्सी मॉन्स्टर वर विश्वास ठेवत नाही अशी टिप्पणी करून हा वाद बंद करण्याचा प्रयत्न केला. बरेच लोक शिल्सच छायाचित्र बनावट असल्याचंच मानून त्याला पुरावा म्हणून नाकारतात [या छायाचित्राला "लॉक नेस मपेट (बाहुली)" असेही संबोधले जाते]. 


१९७७ मधील डॉक शिल्स छायाचित्र 

तर आशा करतो की तुम्हाला हे सगळं सांगायचं तात्पर्य कळालं असेल. अश्या बऱ्याच फिल्म्स आणि छायाचित्रं आहेत ज्यांत लॉकच्या पृष्ठभागावर काही गोळे दिसतील परंतु जे काही स्पष्ट किंवा कळतील असे पुरावे आहेत ते सगळेच्या सगळे  एकतर बनावट आहेत किंवा इतके प्रश्न उठवणारे आहेत की त्यांवर विश्वास ठेवणे कठीणच जाते. जर लॉक नेस मध्ये एखादा राक्षस किंवा राक्षसं आहेत तर इथे मूलतः काहीतरी चुकीचं आहे असं बरिचशी वस्तुनिष्ठ वृत्तीची माणसे मान्य करतात. १९३३ ला नवा पक्का रस्ता खुलल्यानंतर प्रत्यक्षदर्शींमध्ये कमालीची वाढ झाली व अजूनही नव्या नव्या नोंदी येतच आहेत. परंतु, मागील ८० वर्षांमध्ये एकही स्पष्ट आणि खरी अशी फिल्म अथवा छायाचित्र आपल्या हाती लागलेले नाही. एकही नाही. सद्यस्तिथीला वर्षाकाठी जवळ जवळ एक दशलक्ष पर्यटक लॉक नेसच्या बाजूने प्रवास करतात. यातील सगळेच जण नेस्सी दिसेल या आशेने अक्खा लॉक आपल्या मोबाईल आणि कमेऱ्यांनी छाणुन काढतात. यात आणखीन भर पडते ती शोधमोहिमांसाठी लॉकच्या परिसरात फिरणाऱ्या प्रशिक्षित छायाचित्रकारांची. जर खरंच या ठिकाणी दावा केल्याप्रमाणे प्राचीन व आकाराने मोठ्या अश्या प्राण्यांची वस्ती असती तर या असल्या परिस्तिथीत त्यातील कोणाचीतरी एखादी स्पष्ट फिल्म किंवा छायाचित्र आतापर्यंत आपल्याला मिळाले असते ना?

एकही छायाचित्र किंवा फिल्म अजून मिळाली नाही याचा अर्थ लॉकमध्ये वेगळं अस काहीच नाही असा युक्तिवाद नास्तिक्यवादी करतात. आणि मीही जवळजवळ याच विचाराने याकडे पाहतो. जवळजवळ. कारण मला असे वाटते एक छायाचित्र आहे जे नक्कीच काहीतरी चित्तवेधक दर्शवते आणि काही साक्षीही आहेत ज्या इतर लोकांच्या साक्षींपेक्षा जास्त मूल्यवान आहेत. पण त्यांबद्दल मी "माझे मत" या भागात जास्त खोलवर बोलेल. 
  • थिअरिज
थिअरिज विचारात घेण्यापूर्वी आपण प्रथम लोच नेसबद्दल बोलूयात. २२ मैल लांब व काही ठिकाणी एक मैल रुंद असलेला लॉक खूप मोठा आहे. तो खूप खोलही आहे (खूप खोल, उदाहरणार्थ, लॉक त्यालगत असलेल्या नॉर्थ सी पेक्षाही बऱ्यापैकी खोल आहे). उर्कहार्ट बे भागातील खोली ही ८०० फूट पेक्षाही जास्त नोंदली गेली आहे. काही ठिकाणी लॉक १००० फुटांपेक्षाही खोल असल्याच बोललं गेलं आहे परंतु त्यास शास्त्रीय आधार अजून तरी मिळालेला नाही. लॉक मध्ये असलेलं पाण्याचं प्रमाण हे भोवळ येईल, भीती वाटेल इतके जास्त आहे. कोणीतरी असं गणित मांडलंय की जरी आपण लॉकमधील सर्वच्या सर्व पाणी व गाळ काढून त्याला रिकामा केला व पृथ्वीतलावरील सात अब्ज माणसांना त्यात भरले तरी लॉक हा ९०% रिकामाच राहील! इथे इतकं पाणी आहे की लॉकचं स्वतःच एक मायक्रोक्लायमेट आहे. हिवाळ्यात लॉकच्या आसपास असलेला भाग दूरच्या इतर ठिकाणांपेक्षा पाच ते सहा अंशाने उबदार असतो. उन्हाळ्यात लॉक हा वातावरणातील हवेपेक्षा खूप थंड असतो. या वातावरणामुळे मृगजळ (mirage) तयार होतात. येथे लॉकच्या जवळ असलेला हवेचा थर वेगळ्या तापमानाचा असतो व यामुळे दूर असणाऱ्या वस्तुंच्या प्रतिमा या विकृत किंवा अर्धवट दिसतात. 


उर्कहार्ट कॅसल मधून उत्तरेकडे पाहतानाचे लॉक नेसचे दृश्य

लॉक नेस हा एक मेजर फॉल्ट लाईन वर स्थित आहे आणि या भागात नेहमीच हादरे व एखाद दुसरे भूकंप होतच असतात. मागील मोठा भूकंप हा १९७५ मध्ये झाला होता परंतु लॉकच्या पातळीला कमी जास्त करणारे जोरदार हादरे हे १८१६, ११८८, १८९० व १९०१ मध्ये नोंदवले गेलेत. छोटे हादरे इथे साधारणपणे होतच असतात. कॅलेडोनिअन कॅनल व नॉर्थ सी यांद्वारे लॉक समुद्राला जोडला गेला आहे. हे दोन्हीही इनव्हरनेस शहरातून जातात. लॉक ते नॉर्थ सी हा चॅनेल मार्ग पाच मैलांचा असून लॉक ते अरुंद परंतु खोल अश्या ब्युली फर्थ चॅनेल कडून पुढे मोठ्या मोरेय फर्थ कडून तो शेवटी नॉर्थ सी ला मिळतो. नदी किंवा कॅनलचा वापर करून समुद्राकडून लॉकमध्ये किंवा लोचमधून समुद्राकडे कोणता प्राणी प्रवास करू शकेलं का असा प्रश्न बऱ्याच लोकांनी उपस्थित केला आहे. लॉक व समुद्र या दरम्यान सहा लॉक (lock) गेट असल्यामुळे कॅनलचा मार्ग जरा कठीण वाटतो. यातील पाच गेट हे इनव्हरनेस शहरात आहेत प्रचंड मोठा प्राणी येथून प्रवास करताना न दिसणे अशक्य आहे. या नदीवर दोन बंधारेही आहेत परंतु ते प्रवासास अडथळा ठरतील याबाबत मी साशंक आहे. कारण मोठे सॅलामन मासे दरवर्षी नदी व बंधारेंचा प्रवास करून अंडे घालण्यासाठी लॉक मध्ये येतात. तर यामुळे मोठा प्राणी नदी व बंधारे असा प्रवास करून लॉक मध्ये येणं अशक्य नाही.


नेस नदीवरील हॉल्म मिल्स बंधारा. हे छायाचित्र उन्हाळ्यातील आहे जेव्हा पाण्याची पातळी बऱ्यापैकी कमी असते. पाणी एकदाच अचानक वाढल्यास ही पातळी काही फुटांनी वाढते. 

थिअरिज बद्दल बोलायचं झालं तर आपण सर्वप्रथम लॉक नेस मध्ये प्लेसीओसॉर सारखा प्राणी (किंवा प्राण्यांचा समूह, कारण १८०० ते चालू काळ यांतील घटनांसाठी एक एकटा प्राणी कारणीभूत असणे हे काही योग्य वाटत नाही) काही कारणास्तव डाइनोसॉर विलुप्त झाले अशा वेळीही टिकून राहिला याबद्दल बोलू. मला सांगावयास खेद वाटतो की ही थिअरि खूपच अतार्किक आहे. का बरं? कारण डाइनोसॉर पुष्कळ वर्षांपूर्वी नामशेष झालेत आणि लॉक नेस हा आत्ता आत्ता सुरू झालेला प्रकार आहे. मागील २०,००० वर्षांपूर्वी पर्यंत लॉक नेस आणि ग्रेट ग्लेन हे बर्फाने अच्छादलेले प्रदेश होते. खूप जास्त बर्फाने. यातील काही बर्फाचे थर एक मैल व त्यापेक्षाही जाड होते. हा बर्फ इथे १,००,००० वर्ष होता व या बर्फाच्या थरांखालील हिमनद्यांच्या हालचालींमुळे ही पूर्ण  दरी ओढली गेली व त्यातून ग्रेट ग्लेनची निर्मिती झाली. बर्फाच्या आधी येथे ग्लेनही नव्हतं आणि लॉकही. हा बर्फ जवळ जवळ १०,००० वर्षांपूर्वी वितळला व डाइनोसॉर विलुप्त होऊन तेव्हा बराच काळ लोटला होता. तुम्ही कितीही वाद घातला तरीही शेवटचा प्लेसीओसॉर मृत झाल्याच्या ६५ दशलक्ष वर्षांनंतर लॉक नेसची निर्मिती झाली व हेच सत्य आहे. तर यामुळे हे शक्यच नाही की प्लेसीओसॉरचा एखादा गट लॉक मध्ये निवारा घेऊन डाइनोसॉरच्या विलुप्तीपासून वाचला असेल. तेथे जे काहीही असेल, ते नक्कीच डाइनोसॉर नाही. 

जुलै १९३३ मध्ये स्पाइसर्स दाम्पत्याला झालेल्या ''डाइनोसॉर'' दर्शनामुळे प्लेसीओसॉर थिअरिला बरेचशे अनुयायी लाभले. त्यांचे 'डाइनोसॉरचे' वर्णन अॅलेक्स कॅम्पबेलच्या १९३३ ऑक्टोबर मधील लांब मानेचा प्राणी या नोंदीने व पुढे सर्जनच्या छायाचित्राने आणखीनच प्रसिद्ध झाले. १९३४ सालच्या मध्यापर्यंत लॉक नेसमध्ये प्लेसीओसॉर सारखा दिसणारा कोणतातरी लांब मानेचा प्राणी वास्तव्य करून आहे या विचाराने सगळ्यांच्याच मनात घर केलं होतं. तरीही, स्पाईसर्स दाम्पत्याचा दर्शनात शंका घेण्यासारख्या बाबी आपल्याला दिसून येतील. या दाम्पत्याने आपल्या समोरून एक भला मोठा प्राणी रस्ता ओलांडून लॉकमध्ये गेला असे सर्वांना सांगितले होते परंतु येथील स्थानिक पत्रकाराने बातमी समजताच लगेचच या ठिकाणी जाऊन पाहणी केली व त्याला रस्त्याच्या दोन्ही बाजूस बसवलेलं कुंपण सुस्तिथीत दिसले. याचबरोबर येथे कोणत्याही प्रकारचे पायाचे किंवा शरीराचे ठसे नव्हते आणि गवत व छोटी झाडेही कुठेच सपाट झालेली दिसत नव्हती. याचं सर्वात सोप्प स्पष्टीकरण अस दिलं जात की स्पाईसर्सना त्या दिवशी मोठा प्राणी नाही तर छोटा प्राणी (पाणमांजर असावा असं सांगितलं जातं) रस्ता ओलांडताना दिसला जो धुक्यामुळे त्यांना स्पष्ट दिसला नसावा. 

अॅलेक्स कॅम्पबेल यांनी नंतर मान्य केलं की त्यांना जो काही मोठा, लांब मानेचा प्राणी  दिसला होता तो एक करढोक पक्षी होता. आपल्याला हेही माहिती आहे की सर्जनचे छायाचित्रही बनावटच आहे. यानंतर काढलेली, लांब मानेच्या प्राण्याला दुजोरा देणारी इतर छायाचित्रंही खोटी किंवा चुकीची ठरवली गेली आहेत. बऱ्याचश्या लांब मानेच्या प्राण्याच्या नोंदी ह्याही खोट्या किंवा साधारण गैरसमज म्हणून ठरवल्या गेल्या आहेत. लॉक नेस मध्ये लांब मानेचा प्राणी किंवा एखादा प्राचीन प्राणी राहतोय याचा काहीही पुरावा आपल्याकडे नाही. याचबरोबर आपल्याला अशा काही भौगोलिक बाबी माहिती आहेत ज्या या डाइनोसॉरच्या थिअरिला अशक्य ठरवतात. माफी असावी, कल्पना खूप चांगली आहे परंतु ही थिअरि कोणत्याच स्तरावर काम नाही करत. 


बऱ्याच लोकांना लॉक नेस मॉन्स्टर हा कलाकाराने तयार केलेल्या प्लेसिओसॉरच्या वरील चित्रासारखा दिसतो असे वाटते. 

इतर थिअरिज मध्ये नेस्सी हा एक प्रकारचा पाणसरडा (Gauld, The Loch Ness Monster and Others, 1934), एक रस्ता चुकलेला समुद्री ड्रॅगन (Oudemans, The Loch Ness Animal, 1934), एक मोठा अपृष्ठवंशी प्राणी (Holiday, The Great Orm of Loch Ness,1968) आणि आणखीन काय तर (वैयक्तिकरित्या माझी आवडती) फक्त सोंड बाहेर ठेवून लॉक मध्ये पोहोणारा साधा हत्ती (पुरातत्वशास्त्रज्ञ व कलाकार निल क्लार्क, Open University Geological Society मध्ये मार्च २००६ साली प्रकाशित झालेल्या लेखातून) असावा असे दावे केले आहेत. ओके, शेवटची थिअरि वाटते तितकी वेडपट नाही. यात अस म्हंटल गेल की कदाचित १९३० च्या दशकात लॉकला प्रवासी सर्कसने भेट दिली असावी. या सर्कसमधील हत्तींनी पाण्यामध्ये बरयाच वेळा अंघोळ केली असावी व एकमेकांसोबत खेळलेही असावीत. याच्याच सोंडींना प्रत्यक्षदर्शींनी चुकून मोठ्या मानेचा प्राणी म्हणून पाहिले असावे. खरंच त्या त्या वेळी या परिसरात अशी सर्कस होती का, किंवा हत्ती इतके १०० वर्ष लोकांना वेडं कसं बनवू शकतील याबद्दल या लेखात काहीच लिहिलेलं नाही. 


फ. व. हॉलिडे यांनी लॉक नेस मॉन्स्टर हा आकाराने मोठा असा एक अपृष्ठवंशी स्लग आहे असा निकष त्यांच्या पुस्तकात मांडला. नाही म्हंटल तरी या १९७० च्या आवृत्तीचे मुखपृष्ठ पाहून तुम्हाला ते समजलंच असेल. 

आता हीच समस्या या सगळ्या थिअरिजना ग्रासते- त्यांना कोणत्याही प्रकारचे सबळ पुरावे नाहीत. ज्याप्रकारे इतक्या साऱ्या लोकांनी काहीतरी पाहिल्याची इतकी सारी विविध वर्णने आणि वृत्तांत दिलेत त्यावरून हा एकच प्राणी सर्वांनी पाहिला असावा असे वाटत नाही. काहींनी एक कुबड असलेला प्राणी पाहिला आहे तर काहींनी अनेक कुबड असलेला. काहींनी लांब मान व छोटं डोकं असलेला प्राणी पाहिला आहे. काहींनी एखादी व्हेल किंवा उलट्या बोटीसारखा दिसणारा प्राणी पाहिला आहे. टीम डिन्सडेल सारख्या काही लोकांनी प्लेसीओसॉर सारखा मजबूत फ्लिपर असलेला प्राणी पहिला आहे. हॉलिडे ने आपल्या अपृष्ठवंशी प्राणी या थिअरितुन हा प्राणी गरजेनुसार नाट्यमयरीत्या आपला आकार बदलू शकत(कमीत कमी पाण्यावरील भाग)असेल व यामुळेच सर्वांना वेगवेगळ्या आकारात हा प्राणी दिसत असेल असा तर्क लावण्याचा प्रयत्न केला. यात समस्या अशी की आतापर्यंत भूतलावर असा कोणता प्राणी जन्माला आल्याचे काहीही पुरावे नाहीत तर लॉक मध्ये असा काही प्राणी ठाण मांडून असणे दूरच!

या सगळ्या बाबींमुळे दुसऱ्या मुख्य थिअरि कडे कलंडण्याची इच्छा होते. ही थिअरि अशी की लोकं ही नैसर्गिक घडामोडींना चुकून अपरिचित प्राणी समजून फसत आहे. आपल्याला जे हवं तेच आपण पाहतो- जेव्हा कोणी माणूस लॉक नेसला भेट देतो, तेव्हा त्याला एका अपरिचित प्राण्याची झलक पाहण्याची आस असते आणि बऱ्याच जणांना प्लेसीओसॉर सारखा दिसणारा प्राणी दिसेल अशी आशा असते. आता जेव्हा ते लवकर ओळख न पटवता येणारं अस काही या पाण्यात बघतील तेव्हा सहाजिकच त्यांना ते एक राक्षसच वाटेल. आता हीच वस्तू जर त्यांनी इतर ठिकाणी पाहिली असती तर कदाचित त्यांना तिचं एखाद तार्किक- सरळ सोप्प स्पष्टीकरण देता आलं असतं. या थिअरिकडे माप लगेच झुकते. अर्धवट बुडालेले, पाण्यात तरंगणारे ओंडके, पाणमांजरं, करढोक आणि मोठे इल मासे हे नक्कीच बऱ्याच नोंदींची उत्तरे आहेत.


मॉन्स्टर हंटर ह्यू कोकरेल यांनी १९५८ मध्ये टिपलेल्या या छायाचित्रात मॉन्स्टर दिसतो असा दावा केला जायचा परंतु खात्रीपूर्वक तो एक तरंगता ओंडका आहे. 

लॉक नेस च्या पृष्ठभागावर एक वेगळ्या प्रकारचा इफेक्ट तयार होत ज्याने बघणाऱ्याला ते एक राक्षसच वाटते. एखादी बोट जेव्हा लॉकच्या पाण्यातून प्रवास करते व बोव वेव्ह (लाटा) तयार होतात तेव्हा हा स्टँडिंग वेव्ह इफेक्ट दिसून येतो. लॉक जेव्हा शांत असतो तेव्हा हा प्रकार आणखीन तीव्रतेने दिसून येतो. बोटमुळे तयार झालेल्या या बोव वेव्ह जोपर्यंत किनारा लागत नाही तोपर्यंत पसरतात व त्यानंतर त्या पुन्हा लॉक च्या मध्याला परावर्तित होतात (easier to explain in English, for example, waves form and spread out until they hit the shoreline and once they hit, they are reflected back into the center of the Loch). जिथे या वेव्ह एकमेकांना छेदतात तेथे कुबड सारखी आकृती तयार करतात. जोपर्यंत तुम्ही स्वतः हा प्रकार पाहणार नाही तोपर्यंत तुम्हाला हे किती वेगळं दिसत ते समजणार नाही. इतर लॉक आणि तलावांतही हा प्रकार पाहायला मिळतो. ज्या अरुंद पाण्याच्या साठ्यांमध्ये दोन्ही बाजुंनी समांतर अंतरावरून बोट प्रवास करतात तेथे हा इफेक्ट लगेच दिसून येतो. बोटीने तयार केलेल्या वेव्ह जितक्या मोठ्या, तयार होणार कुबडही तितकेच मोठे व स्पष्ट दिसते. लॉक मध्ये बऱ्यापैकी मोठया बोट प्रवास करतात. यात पर्यटनासाठी वापरल्या जाणाऱ्या कृझरचाही समावेश आहे. लॉक हा कॅलेडोनिअन कॅनलचा भाग असून येथील उत्तरी व दक्षिणी किनारी भाग हा मासेमारी करणाऱ्या बोटींकडून वापरला जातो. इतर ठिकाणी या लाटांकडे कोणी लक्ष देत नाहीत परंतु येथे फरक हाच आहे की लोकं राक्षस बघण्याच्या उद्देशाने लॉकला येतात आणि या लाटांना राक्षस समजून बसतात. 


लॉक नेसमधील बॉ वेव्ह. हे १९६० च्या दशकात एका मॉन्स्टर पकडायच्या मोहिमेने काढलेलं छायाचित्र आहे. 

जर तुम्ही पाण्याच्या पृष्ठभागाच्या समांतर कोनातून पाण्याकडे पाहाल तर या वेव्ह फक्त एकमेकांना छेदतील तेव्हाच तुम्हाला दिसून येतील. इतर वेळेस शांत असणाऱ्या पाण्यात या वेव्ह जेव्हा छेदतात तेव्हा दोन ते तीन चमकणारी कुबडं तयार होतात. ही कुबडं बोटच्या दिशेने बोटच्याच वेगाने प्रवास करतात. या वेव्हना त्या तयार होण्यापासून ते एकमेकांना छेदण्यापर्यंत सहा ते आठ मिनिटे लागतात. तरंग तयार करणारी बोट जरी दहा नॉट (१८ किमी) इतक्या कमी वेगाने प्रवास करत असेल तरी या सहा ते आठ मिनिटांत ती कमीत कमी अर्धा मैल पुढे गेलेली असते. त्यामुळे बघणाऱ्यास ही कूबडं या बोटींशी संबंधित वाटत नाहीत. 

याचबरोबर लॉकमधील स्टँडिंग वेव्ह या त्यांना तयार करणाऱ्या बोटीच्या वेगाची नक्कल करतात. जर बोट मंद गतीने चालत असेल तर लाटांचा वेगही मंद असतो व पाच सहा मिनिटांनंतर त्या एकमेकांस मिळतात तेव्हा कोणतातरी प्राणी हळू हळू पाण्यात जातोय असा भास होतो. जर बोटीचा वेग जास्त असेल तर याच्या एकदम विरुद्ध प्रकार पाहायला मिळतो. जास्त वेगामुळे कुबडाचा आकारही वाढतो. जर तुम्ही लॉकला उंचावरून पहिलं तर सगळ्या लाटा एकसाथ दिसतात व हा प्रकार लगेच लक्षात येतो. लॉकच्याच पातळीवरून पाहिल्यास या लाटांचा समूह  आहे असे लक्षात येत नाही व तयार होणारे कूबड आणखीनच विचित्र दिसते. मी स्वतः बऱ्याच वेळेस, त्यातही जास्त करून शांत आणि चांगलं वातावरण असणाऱ्या दिवसांत हा प्रकार पाहिला आहे. उन्हाळ्यातील एका दिवशी मासेमारीची एक बोट येथून जात होती व तिच्याकडून उत्कृष्ट स्टँडिंग वेव्ह बनत होत्या. माझ्या खाली बीच जवळ उभ्या असलेल्या पर्यटकांनी त्या वेव्ह कडे उत्स्फूर्तपणे हातवारे केले व छायाचित्रेही काढली. घरी परतल्यावर त्यांनी आपल्याला राक्षस दिसला असेच सर्वांना सांगितले असेल. 


पाणमांजरं नक्कीच काही मॉन्स्टर साईटिंग्स साठी जबाबदार आहेत. 

माझा ठाम विश्वास आहे की एक किंवा अनेक कूबड दिसलेल्या बऱ्याचश्या घटनांमागे स्टँडिंग वेव्ह इफेक्ट चा हात आहे. हा इफेक्ट जेव्हा विंडरोज (जोरदार हवे मुळे पाण्यात तयार होणारे काळे डाग), सॅलमोन सारखे मोठे मासे, सूर मारणारे पक्षी, पाणमांजरं व सील यांसोबत काम करतो तेव्हा सहाजिकच येथे राक्षस बघायला येणाऱ्या लोकांस तो राक्षसच भासत असेल. 

तर, इतकंच का? लॉक नेस मॉन्स्टर ही फक्त पर्यटकांच्या संभ्रमातून निर्माण झालेली एक दंतकथाच आहे काय? या सर्व घटना नैसर्गिक असून त्या फक्त चुकीची ओळख दिल्यामुळे दंतकथा बनून गेल्या आहेत का? मला हे अर्धसत्य वाटते. यातील खूप, जवळ जवळ बऱ्याचश्या घटनांना एक नैसर्गिक व तार्किक उत्तर आहे. पन सगळ्यांनाच तसलं उत्तर आहे असं नाही. 
  • माझे मत
मिस्टरी इंक च्या लेखांमध्ये कधीनव्हे ते आज पहिल्यांदा मी माझ्या स्वतःच्या अनुभवाबद्दल बोलणार आहे. मी खालील कोणत्याही गोष्टी सिद्ध नाही करू शकत यामुळे मी मूर्ख आहे, चुकतोय किंवा खर सांगतोय हे आता तुम्ही स्वतः ठरवायचं आहे.  कदाचित मी यातील तिन्ही असेल.  यातील काहीही खर आहे असं मला वाटत नाही (म्हणजे, मला माहिती आहे की मी जे बोलतोय ते खरं बोलतोय पण मी चुकतोय किंवा पागल आहे, आणि जर मी चुकत असेल किंवा पागल असेल तर मला त्याची जाणीव असेल का?!). परंतु, या रहस्याच्या शोधात आणखीन खोल जाण्यासाठी मी हा चान्स घ्यायला तयार आहे. 

१९९१ च्या पूर्वार्धात मी स्कॉटलांडच्या हायलँड्स मध्ये आलो, इनव्हरनेस शहरापासून २५ मैल वायव्येस व लॉक पासून सात मैल अश्या दूर शांत ठिकाणी मी घर घेतलं. मी वीस वर्षांहून जास्त काळ येथे रहिवास करून होतो. याआधी मी स्कॉटलांडच्या पश्चिमेकडील अबरडीन येथे राहिलो आहे. मी नेस्सी बद्दल ऐकून होतो व या कथेत मला रसही होता परंतु लॉक मध्ये खरंच कोणता तरी निराळा प्राणी राहतो का याबद्दल माझे स्पष्ट असे काही मत नव्हते (तरीही प्लेसीओसॉरचा विचार मला तद्दन मूर्खपणाचं वाटायचा). 


मी पाहिलेली वस्तू या छायाचित्रात पुढे दिसत असलेल्या पादचारी पुलाकडे प्रवाहाविरुद्ध प्रवास करत होती. या वेळी मी या छायाचित्रात मागील बाजूस दिसणाऱ्या पुलावर गाडी चालवत होतो. 

एका दुपारी, १५:४५ ला मी A82 मार्गावरून इनव्हरनेसच्या मध्यभागातून माझ्या पत्नी सोबत उत्तरेस प्रवास करत होतो. ट्राफिक भयानक होती त्यामुळे आम्ही बराच वेळ नेस नदीवरील पुलावर वर थांबून होतो. वातावरण ढगाळ पण कोरडं होतं आणि प्रकाश मंद व्हायला सुरुवात झाली होती (वर्षाच्या या काळात इकडे १५.५५ लाच सूर्यास्त होण्यास सुरुवात होते). याच दरम्यान माझी नजर खालील नदीत गेली. लगेचच मला एक मोठी, काळसर वस्तू नदीच्या प्रवाहाविरुद्ध प्रवास करताना दिसली. तिच्या हालचालीमुळे पाण्यात बऱ्यापैकी मोठे असे तरंग तयार होत होते. हे मी माझ्या पत्नीच्या नजरेस आणले व आम्ही दोघेही या वस्तूला प्रवाहाविरुद्ध प्रवास करताना पाहत राहिलो. ही वस्तू चपळाईने मार्गक्रमण करत होती. 

नंतर आम्ही दोघांनीही आमच्या नोंदींची तुलना केली आणि ठरवलं की आम्ही जी वस्तू पहिली ती गडद होती, ती काळ्या किंवा राखाडी रंगाची असावी, पाण्याच्या वर आली होती. ती २.५ ते ३ फूट लांब, १ ते १.५ फूट रुंद असावी आणि तिला मोठ्या चढाच कूबड होत. या कुबडाचे शिखर पाण्याच्या १ ते १.५ फूट वर आलेलं होतं. पाण्यावरून सूर्यप्रकाश चमकत असल्यामुळे आम्हाला पाण्याखालील काही दिसणे शक्य नव्हतं परंतु आम्हाला दोघांनाही अस वाटत होतं की हा वर आलेला भाग हा पाण्याखाली बुडालेल्या कोणत्यातरी मोठ्या वस्तूचा भाग असावा. या गुळगुळीत कुबडातुन कोणत्याही प्रकारचे पंख किंवा इतर तस्तम गोष्ट बाहेर येत नव्हती परंतु या कुबडावरून एक रेष किंवा चढण जात होती हे आमच्या दोघांच्या नजरेस आलं. आम्ही एखाद मिनिटभर तीस पाहिलं. नंतर आमच्या मागील ट्राफिक आम्हाला गाडी हलवण्यास सांगू लागली. त्यानंतर आम्ही पुलाला वळसा घालून उत्तरेकडील बाजूस गेलो, तिकडून पुन्हा पुलावर आलो आणि त्यांनतर नदीच्या पूर्व किनाऱ्याच्या बाजूने जाणाऱ्या रुंद रस्त्यावर पोहोचलो. मी गाडी पार्क केली व आम्ही दोघेही गाडीतून उतरून नदीच्या कडेस उभे राहिलो. आम्ही अजूनही या वस्तूला प्रवाहाच्या विरुद्ध आरामात प्रवास करत चालली होती. आता ती लहान दिसत होती व तिच्या पाठीवरील कुबड आता जेमतेम सहा इंच इतकंच पाण्याबाहेर दिसत होतं. तरीही ती मोठे तरंग बनवत चालली होती. याचवेळी कुत्रा फिरवण्यास आलेला एक इसम बाजूला येऊन आमच्यासोबतच या वस्तूकडे बघू लागला. हळूहळू ही वस्तू लहान लहान होत गेली व दिसेनाशी झाली. त्या वस्तूला पहिल्याचा पहिला क्षण व शेवटचा क्षण यांत पाच ते सहा मिनिटं इतका वेळ गेला होता. पुल फिरून आल्यामुळे यातील काही वेळ ही वस्तू आमच्या दृष्टी बाहेर होती. 

बस इतकंच काय ते. इतर नाट्यमय दर्शनांशी तुलना केल्यास माझा अनुभव काहीच नाही हे मला ठाऊक आहे परंतु हे झालं आणि मी काय पाहिलं याबाबत मी ठाम आहे. एक गोष्ट मला येथे नमूद करावीशी वाटते ती अशी की मी किन वॉकर (व डॉग ओनर) आहे आणि स्कॉटलंडच्या बऱ्याचश्या लॉक व नद्यांवर मी वेळ व्यतीत केला आहे. मी तेथील जीवसृष्टीशीबद्दल जाणून आहे यामुळे ते काय नव्हतं यापासून आपण सुरुवात करू. इतकं मोठं कुबड असल्यामुळे ती वस्तू नक्कीच ट्राउट, सॅलामन किंवा ईल नव्हती. ती सिलही नव्हती - ती पाण्यात खूप आरामशीर हालचाल करत होती व सील सारखं ती पाण्यात वर खालीही करत नव्हती. कुबडावरील टोकही कुठल्या सील सारखे नव्हते. पाठीवरील पंखाने लगेच ओळख पटत असल्यामुळे ती डॉल्फिनही (जवळील मोरेय फर्थ मध्ये डॉल्फिन्स आहेत) नव्हती. खूप मोठी आणि जड भासत असल्यामुळे, आकार व हालचालही वेगळी असल्यामुळे ती वस्तू पाणमांजरही नव्हती. खूप मोठी असल्यामुळे ती सूर मारलेला पक्षीही नव्हती आणि ती वारा किंवा लाटेमुळे तयार झालेला इफेक्ट तर नक्कीच नव्हती.

तर, ती काय नव्हती याची मला पूर्ण खात्री आहे. मग, ती काय होती? खर सांगायचं झालं तर मला याची काहीही कल्पना नाही. याआधी अशी वस्तू मी बघितली नव्हती व यानंतरही मला असलं काही कधी दिसलं नाही. जर मी ही वस्तू लॉक नदीमध्ये न पाहता लॉक नेस मध्ये पाहिली असती तर ती उत्कृष्ठ कूबड दर्शनाची घटना झाली असती. आता, माझी पत्नी व मी, आम्ही दोघेच नाही तर इतरही बऱ्याच लोकांना (१९३३ मधील घटना लक्षात आली का ज्यात " मगरीसारखा प्राणी" चा उल्लेख होता व इनव्हरनेस पुला वरूनही तो दिसला होता?) नेस नदी मध्ये काहीतरी वेगळं अस दिसलं आहे ज्यात मोठ्या कुबडाचाही समावेश आहे. बरेचशे मॉन्स्टर इन्व्हेस्टीगेटर्स या गोष्टीला मानत नाहीत कारण बंधाऱ्यांमुळे कोणत्याही मोठ्या प्राण्याला नदी ते लॉक असा प्रवास करणे अशक्य आहे असं त्यांचं मत आहे. मला याची पूर्ण खात्री नाही आणि यामुळेच नदीतील घटनाही लॉकच्या घटनांत सामावून घेणे शहाणपणाचे ठरेल असे मला वाटते. प्रसंगोपात, २०१३ मध्ये मी हायलँड्स सोडून दुसरीकडे राहावयास आलो. येथे घालवलेल्या विसपेक्षाही अधिक वर्षांच्या काळात मी नदी व लॉक दोन्हींजवळून बऱ्याच वेळा प्रवास केला आणि त्या गोष्टीसारखं काही वेगळं असं मला पुन्हा कधीही दिसलं नाही. 

आता दुसऱ्या एका घटनेकडे बघूयात. यावेळी ती माझ्याबरोबर नाही परंतु एका मैत्रिणीबरोबर घडलेली आहे. ती लॉकच्या वरील भागातील डोंगरांत राहणारी ४० वर्षांची स्त्री आहे जिला तिच्या घरातून सुंदर व रमणीय असं उर्कहार्ट बे च पसरलेलं चित्र दिसतं. ही व्यक्ती खूपच साधी, निरस व शांत स्वभावाची आहे. यासगळ्याबरोबरच तीला लॉक मधला राक्षस या कल्पनेचा मोठा तिरस्कार वाटायचा. जो कोणी याउलट वृत्तीची किंवा विचाराची व्यक्ती असेल तीचा ती लगेच अपमान करायची. यामागील एक कारण असे की आमची भेट होण्याच्या दहा वर्षं पूर्वीपासून ती येथेच वास्तव्यास होती व ती सर्रास तिच्या किचन वर्कटोप काउंटर वर बसून खाली लॉकमध्ये पाहायची. लॉक नेसमध्ये रोजच घडणारे स्टँडिंग वेव्ह, विंडरोज इत्यादी प्रकार ती अधून मधून पाहायची. असामान्य वाटेल असे काहीही तिला कधीच दिसलं नाही. हा अनुभव व तिची स्वतःची नास्तिक विचारसरणी यामुळे नेस्सी हा प्रकार तिला मूर्खपणाचं वाटे.


उर्कहार्ट बे 

अस सगळं असताना १९९४ च्या उन्हाळ्यात एके दिवशी तिच्या घरी केलिध चा कार्यक्रमात कोणीतरी दर वेळेप्रमाणे गंमत म्हणून नेस्सीचा विषय काढला. जसं वॅम्पायरला लसूण दाखवल्यावर तो माघार घेतो तशा प्रकारे तिनेही या विषयातून माघार घेतली हे माझ्या लक्षात आलं. नंतर जेव्हा आजूबाजूला कोणीच नव्हत तेव्हा मी तिला याचं कारण विचारलं. आधी तिने याबद्दल बोलण्यास टाळाटाळ केली परंतु शेवटी तिने पूर्ण प्रकार काय ते सांगितला. तिला लॉकमध्ये तर्क न लावता येण्यासारखं काहीतरी दिसलं होतं. एके दिवशी लवकर उठून ती आपल्या किचनच्या कट्ट्यावर कॉफी पित बसली होती तेव्हा तिला उर्कहार्ट बेच्या पाण्यात काहीतरी हालताना दिसलं. ही वेळ होती सकाळी ०५.३० ची (मे मध्ये या भागात सूर्य सकाळी ०४.३० लाच उगवतो) व यावेळी लॉकमध्ये प्रचंड शांतता होती, कोणत्याही बोटी दिसत नव्हत्या व रस्त्यावरही वाहनांची काहीच वर्दळ नव्हती. तिने जे पाहिलं ते इतर घटनांनइतकं नाट्यमय नव्हतं - काहीतरी खूप मोठी वस्तू तिने पाण्याच्या खाली अथवा पृष्ठभागावर फिरताना पहिली होती. लॉकच्या काळसर पाण्यात (लॉक नेस हा मोठ्या प्रमाणात पिट डेब्रीत रंगून निघाला आहे व यामुळे कधी कधी येथील पाण्याची पारदर्शकता दोन ते तीन फूट इतकी कमीही असते) तिला इतक्या काही बाबी नीट दिसल्या नाहीत परंतु ती म्हणाली 'ते खूप मोठं होतं आणि जिवंतही!'
तिने १० मिनिटे या वस्तुस पाहिले व त्यानंतर ती वस्तू बे मधून लॉकच्या मुख्य भागात पोहोचली जिथे ती पाण्यात बुडुन दिसेनाशी झाली.  

अजून विचारपूस केल्यावर तिने काहीशी अजून माहिती दिली. ती वस्तू गडद चॉकलेटी रंगाची होती (परंतु पिट ने रंगलेल्या पाण्यात सगळंच चॉकलेटी दिसतं), ती पुष्कळ जड भासत होती आणि त्या वस्तूला मान किंवा पंखही नव्हते.ती वस्तू किती मोठी होती यावर तीच एकच मत होतं- ती वस्तू खूपच मोठी होती, उर्कहार्ट बे मध्ये फिरणाऱ्या एखाद्या केबिन क्रूझर पेक्षाही पुष्कळ मोठी.  या प्राण्याचे काही भाग हे पाण्याबाहेर आले होते असं तिला वाटत होतं परंतु वरून पाहत असल्यामुळे तीला याबाबत खात्री नाही. प्राण्याच्या आकारावरून तिला ठाम विश्वास बसला की हा प्राणी लॉकमध्ये राहणाऱ्या प्राण्यांपैकी नाहीये. तिच्याशी बोलताना मला सर्वात नवल वाटलेली गोष्ट म्हणजे तिच्या बोलण्यातील नाराजी व अस्वस्थता. कारण जेव्हा लोकं आपल्याला जग उलगडलेलं आहे अशा भावाने जगत असतात आणि अचानक समजण्यापलीकडील एखादी गोष्ट अनुभवतात तेव्हा त्यांचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत असावा अशी मला शंका आहे. मला आलेल्या अनुभवासारखंच तिच्याही अनुभवातून आपल्याला फक्त इतक्याच गोष्टी समजल्या आहेत - ती वस्तु मोठी होती, हालचाल करत होती व तिने आधी कधीही असं काही पाहिलं नव्हतं. नक्कीच, तिचा अनुभव गैरसमज असू शकतो आणि तिने जे काही पाहिलं ते काहीतरी ओळखीचं किंवा तर्कसंगत असू शकतं. परंतु वर्षानुवर्षे लॉक कडे पाहत असलेल्या व्यक्तीकडून येणारा हा अनुभव मला प्रभावित करतो. 

आता तुम्ही विचार करत असाल की मी हे दोन अनुभव इथे का सांगतोय? कारण हे दोन्हीही अनुभव नाट्यमय तर नाहीतच पण त्याचबरोबर लॉक नेसच्या विचित्र इतिहासात काही वेगळा तपशीलही त्या भरत नाहीत. यातील एक कारण म्हणजे हे दोन्हीही अनुभव कधी नोंदवले  गेले नाहीत. आणि दुसरं म्हणजे, इथे घालवलेल्या माझ्या वास्तव्यात मी इतर डझनभर राहिवास्यांकडूनही अशाच प्रकारच्या नोंदी जमा केल्या आहेत. या सगळ्या बऱ्यापैकी लोव की घटना होत्या ज्या मच्छिमार किंवा लॉकवर काम करणाऱ्या लोकांकडून मी जमा केल्या होत्या. यातील बऱ्याच घटनांत लॉकच्या आपल्या माहितीत असलेल्या जीवांपेक्षाही मोठ्या आकाराचे काहीतरी लॉकमध्ये ठाण मांडून आहे असा सूर होता. यातील कोणीही आपल्याला डोकं किंवा मान दिसल्याच सांगितलं नाही. यातील बरीच लोकं मला हे अनुभव सांगताना शरमेने सांगत असत व शेवटी ' पण कदाचित ते दुसरं काहीतरी असेल...' असंही त्यात जोडत असत. तरीही एक गोष्ट अशी की या सगळ्या नोंदी या १९३३ च्या आधी वृत्तपत्रांत प्रकाशित झालेल्या लोचमधल्या मोठ्या मास्याच्या बातम्यांशी मेळ खात होत्या. आणि यामुळेच तिथे नक्कीच काहीतरी वेगळं आहे यावर माझा विश्वास बसू लागला. पण या विषयाला समतोल ठेवण्यासाठी मी येथे हेही नमूद करेन की बरेच वर्षे येथे राहिलेल्या इतर स्थानिक लोकांनी काहीही वेगळं किंवा विचित्र असं अजूनही पाहिलेलं नाही. यात मागील वीस वर्षांपासून आठवड्यातून चार दिवस लॉक मध्ये ये जा करणाऱ्या एका स्थानिक क्रूझर च्या कॅप्टनचाही समावेश आहे. जर येथे खरंच काही वेगळं असत तर ते आपल्याला कधी ना कधी तरी दिसलंच असतं असं या कॅप्टनच मत आहे. 


एकदा तर शेरलॉक होल्म्सने सुद्धा लॉक नेस मॉन्स्टर मध्ये रुची घेतली. द प्रायव्हेट लाईफ ऑफ शेरलॉक होल्म्स (१९७०) या चित्रपटात त्याला समजतं की हा राक्षस खरतर वेष बदलून ठेवलेली एक पाणबुडी आहे. या चित्रपटासाठी तयार केलेला प्रॉप मॉन्स्टर एका बोटीला जोडून नेट असताना पाण्यात बुडाला. २०१५ मध्ये लॉकमध्ये केलेल्या एका अंडर वॉटर सर्वे मध्ये तो तळाला चांगल्या अवस्थेत पडून आहे असे समजले. 


स्थानिक वृत्तपत्रांत १९३३ मधील राक्षस दंतकथेच्या उत्पत्ती अगोदरील लेख चाळल्यास असल्या बऱ्याचश्या नोंदी भेटतील. इतक्या की १८६० दशकाच्या उत्तरार्धात बऱ्याच स्थानिक लोकांनी मान्य केलं होतं की लॉकमध्ये एक प्रचंड मोठा मासा ठाण मांडून आहे. लक्षात घ्या, राक्षस नाही तर एक प्रचंड मोठा मासा जो कधीतरीच कोणाला दर्शन देतो. लॉकसारख्या मोठ्या पाण्याच्या साठ्यात एखादा प्रचंड मोठा मासा असण्याची कल्पना असाधारण तर आहेच पण लॉकमध्ये डाइनोसॉरची कॉलनी असावी या कल्पनेइतकी खुळचट तर ती नक्कीच नाही. आपल्याला माहिती आहे की लॉकमध्ये डाइनोसॉरची कॉलनी नाहीच आहे परंतु या कल्पनेत लोकांच्या असलेल्या रुचिमुळे आधुनिक नेस्सी दंतकथेचा जन्म झाला जिच्यामुळे लॉकमध्ये काय राहतं याची जी काही साधारण उत्तरे होती ती धूसर होऊन गेली. या कल्पनेच्या तिव्रतेमुळेच मुख्य प्रवाहातील शास्त्रज्ञ व निसर्ग अभ्यासक लॉकचा अभ्यास करण्यापासून अलिप्त राहिले. आणि इतक्या वर्षांत जी काही वृत्तांत व छायाचित्रे भेटलीत ती सगळी एकतर संशयास्पद, जाणीवपूर्वक केलेली लबाडी अथवा नैसर्गिक बाबींची चुकीची ओळख केली गेलेली आहेत. या सगळ्या गोळ्यात एक गाभाही आहे ज्यात लॉकमध्ये काहीतरी विचित्र आहे असं सांगणाऱ्या विश्वसनीय घटना आहेत. परंतु या घटनांत फक्त पाण्यात काहीतरी मोठं आहे असं दर्शवणारं एक एकटं कुबड किंवा हालचाली यांचच विवरण केलं आहे. लॉकमध्ये एक लांब मानेचा प्लेसीओसॉर सदृश्य प्राणी राहतो ही पुराव्याभावी तयार झालेली एक रेड हेरिंग आहे जिच्यामुळे इन्व्हेस्टीगेटर्स मागील ८० वर्षांपासून खऱ्या पुराव्यांपासून दूर राहिले आहेत. 

पण जर पुरावे आपल्याला लॉकमध्ये काहीतरी असाधरणपणे मोठी गोष्ट आहे (किंवा भूतकाळात तरी होती) जी डाइनोसॉर किंवा मोठा पाणसरडाही नाही असं सांगतात तर मग ती नक्की काय आहे? बऱ्याचश्या विश्वसनीय नोंदींत (विश्वसनीय म्हणजे ज्यांना लॉकची पूर्ण ओळख आहे व येथील जीवसृष्टीशीही जे परिचित आहेत यांचे अनुभव) एक एकटं कुबड पाण्यात हळू हळू प्रवास करताना व नंतर पाण्याखाली बुडतानाची वर्णने आहेत (ही वर्णने एकापेक्षा अधिक संख्येने, जलदगतीने प्रवास करणाऱ्या स्टँडिंग वेव्हच्या कुबडांच्या अगदी उलट आहेत). काही प्रत्यक्षदर्शींनी या कुबडाला ''व्हेल सारखं'' वर्णिलं आहे परंतु बऱ्याच जणांनी त्याचे वर्णन ''एका उलटलेल्या बोटी सारखं" केलं आहे. आता क्षणभर विचार करा - सगळ्याच बोटींचे शरीर हे तिच्या मुख्य कण्याला वळणदार असते. या कण्याला आता उलटं करा आणि आता तुम्हाला पाण्यातून बाहेर येणारं शिखर समान कुबड दिसेल. लोकं पृष्ठभागावर उभारलेल्या कुबडाच वर्णन करत आहेत असे मला वाटतं. मी स्वतः जे काही नेस नदीमध्ये पाहिलं ते तर नक्कीच पृष्ठभागावरील कुबडं होतं (फक्त ते जरा लहान होत).

आता या राक्षसाच्या पहिल्या वहिल्या छायाचित्रास आपण पुन्हा भेट देऊयात. हे छायाचित्र ह्यू ग्रे या स्थानिक माणसाने काढलं होतं. एके दिवशी चर्च मधून येताना फोयर्स नदी मुखाच्या पश्चिमेस, लॉक च्या दाक्षिणात्य किनाऱ्यावरनं तो चालला होता. १२.०० ते १३.०० दरम्यान त्याला पाण्यात काहीतरी दिसलं:

"मी जिथे उभा होतो तिथे पाण्यातून एक वस्तू बाहेर आली. लगेचच मी माझा कॅमेरा बाहेर काढला व पाण्याच्या पृष्ठभागावापासून  दोन ते तीन फूट बाहेर असलेल्या या वस्तूचा फोटो काढला. तिच डोकं असेल असं काही मला दिसलं नाही, कारण ज्याला मी या वस्तूचा समोरील भाग समजत होतो तो पूर्णपणे पाण्याखाली होता परंतु माझ्यापासून सर्वात दूर असलेला, शेपटी सारखा भाग बरीच हालचाल करत होता. ही वस्तू काही मिनिटांनी पुन्हा पाण्यात नाहीशी झाली."

ग्रे च्या डेली रेकॉर्ड मध्ये प्रकाशित झालेल्या मुलाखतीतून. 

ग्रे ने या वस्तूचं आपल्या बॉक्स कॅमेऱ्याने एक कृष्णधवल छायाचित्र टिपलं. हे छायाचित्र डेली रेकॉर्ड, द डेली स्केच यांसारख्या अनेक वृत्तपत्रांत छापलं गेलं. खाली हेच छायाचित्र त्याच्या खऱ्या, अनक्रॉप आवृत्तीत जस छापलं गेलं होतं तस. याचप्रकारे ते वर्षानुवर्षे बऱ्याच लेखांत, पुस्तकांत आणि वेबसाईटवरही असच वापरलं गेलं व जातंय.


पहिल्यांदा प्रसिद्ध झालं त्यावेळी या छायाचित्राने बरीच उत्सुकता निर्माण केली होती. आजवर त्याचे कसून अनुमान काढले गेले आहेत. ग्रे ला सगळे प्रामाणिक व सरस माणूस समजत आणि हा जाणीवपूर्वक लोकांना वेडा बनवण्यासाठी काढलेला फोटो असण्याची शक्यताही अभ्यासकांनी कधीच खोडली आहे. तरीही, ग्रे ची दृष्टी कमकुवत असल्यामुळे त्याने चुकून रोजमर्राच्याच कुठल्या गोष्टीचं छायाचित्र काढलं असावे असा काहींचा निकष आहे. मग ह्या छायाचित्रात दिसतंय तरी काय? बरेच लोकं आत्मविश्वासाने सांगतात की यात ग्रे चा लॅब्राडोर पाण्यात काठी घेऊन लॉक मध्ये पोहोतोय. काही तितक्याच आत्मविश्वासाने तो हंस आहे असं सांगतात. मला ही दोन्ही प्रकारची फोडणी हास्यास्पद वाटते - या चित्रात जे काही दिसतंय ते कुत्राही नाही आणि हंस ही नाही. पण मग पुन्हा त्यात वारंवार सांगितलेल्या "उलटी बोट" सारखंही काही दिसत नाही. 

तर, मला असं वाटतं की या छायाचित्रात काही मूलभूत समस्या आहेत. सर्वप्रथम, ज्या प्रकारे ही वस्तू पाण्यात बुडली आहे तो प्रकारचं मला चुकीचा वाटतो. ज्याप्रकारे वस्तूची खालची बाजू पाण्यापासून एकदम उठून दिसते ते खूप वेगळंच वाटतं. त्यातही, ग्रे हे छायाचित्र टिपताना नक्की कुठे उभा होता हेही आपणांस माहिती नाही. नोव्हेंबर मध्ये १२.०० ते 13.०० च्या दरम्यान लॉक च्या दक्षिणी किनाऱ्यावर, फोयर्स नदी मुखाच्या पश्चिमेस सूर्य छायाचित्रकाराच्या मागे व आकाशात बराच खाली असायला हवा होता (हिवाळ्यात हायलँड्स मध्ये सूर्य दुपारीही क्षितीजाच्या फार वर जात नाही). मी ही गोष्ट नोव्हेंबरमध्ये याच वेळे दरम्यान फोयर्स नदीवर जाऊन स्वतः पडताळून पहिली आहे आणि ती बरोबरही आहे. आता मी काही फोटोग्राफी एक्स्पर्ट नाहीये, परंतु या प्रकारे जर सूर्य तुमच्या मागे असेल तर पाण्यातील वस्तूची पडणारी सावली दूर वरील बाजूस पडायला हवी. इथे ती पडत नाही आहे. इथे ही वस्तू अशा प्रकारे तिच्या जवळील बाजूवर सावली पाडते आहे जसं की छायाचित्रकार सूर्याकडे तोंड करून उभा होता जे मुळीच शक्य नाही आहे. तर मग याचा अर्थ काय? 

डेली रेकॉर्ड मध्ये हे छायाचित्र उलटं छापलं गेलं असावं व त्यानंतर सगळीकडेच ते तसच वापरलं गेलं असावं अशी मला दाट शंका आहे. चला आता या छायाचित्राला उलटं करून पाहुयात. 


आता सावली छायाचित्रकाराच्या मागे सूर्य असताना जशी दिसायला हवी तशी दूर वरील बाजूस पडलेली दिसते आहे. आणि आता अचानक या वस्तूचा आकार उलट्या पडलेल्या बोटीसारखा (किंवा व्हेल सारखा) दिसायला लागतो. तिच्या पृष्ठभागावर शिखरही दिसून येतं जे बऱ्याच प्रत्यक्षदर्शींनी नोंदवलं आहे. या वस्तूवर असलेली विचित्रशी गडद रंगाची पट्टी आता स्पष्ट सावली आहे असे दिसतंय (जी छायाचित्र उलटं केल्यास काय आहे हेच समजत नाही) जी पुढे वस्तुमागील पाण्यापर्यंत पसरली आहे. कदाचित ती छायाचित्रकाराचीच सावली असावी का? आणि आता ती वस्तूही ग्रे ने दिलेल्या माहितीशी उत्तमरीत्या मेळ खाते आहे ज्यात त्याने "माझपासून सर्वात दूर असलेला, शेपटीसारखा भाग" हालचाल करत होता असं म्हंटल आहे. या छायाचित्राला अशा प्रकारे बघितल्यास, उजवीकडील शेपटीसारखा दिसणारा भाग छायाचित्रकारापासून सर्वात दूर आहे असे दिसते. या छायाचित्रात नक्की काय दिसतंय याची मला अजूनही पूर्ण खात्री नाही परंतु आपण त्याला मागील ८० वर्षांपासून उलटं पाहतोय असं मला वाटतं. कदाचित हे नेस्सीचं पहिलं (आणि एकच?) खरं छायाचित्र असेल का? बऱ्याच प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या वृत्तांतातील "एक उलटलेली बोट" ची पुष्टीही मला ज्ञात असलेल्या या एकाच छायाचित्रात मिळते. 

ओके, आता (फायनली!) वेळ आली आहे लॉक नेस मॉन्स्टर खरोखर काय असू शकतो ते बघण्याची. आणि याची सुरुवात मला मास्यांबद्दल बोलून करायची आहे. मी जाणून आहे की तुम्ही जर प्लेसीओसॉर ची आशा केली असेल तर मासा ही खूप मोठी निराशा ठरते परंतु आता ते चालवून घ्या. मला असे वाटते दिलेलं उत्तर हे सत्य असण्याची दाट शक्यता आहे. सर्वात पहिले तर आपण मास्यांच्या मूलभूत शरीरशास्त्राबद्दल बोलूयात.मासे हे शरीराने स्तनधारी प्राणी किंवा पृथ्वीवरील इतर प्राण्यांसारखं एका ठराविक आकारपर्यंत वाढत नाहीत.  कितीही खाल्लं आणि कितीही वर्षं जगलं तरीही सस्तन प्राणी एका ठराविक मध्यम आकारपर्यंतच वाढतात. त्यापुढे ते वाढत नाहीत. याउलट मास्यांच आहे. मासे हे लगातार वाढतंच राहतात. जसे जसे ते वयाने वाढतात तसे तसे ते शरीरानेही वाढत राहतात. शिकारी प्राण्यांचा अभाव व मुबलक प्रमाणात अन्नाची उपलब्धता असेल तर मासे वाढतच राहतात, शेवटी ते इतके वाढलेले असतात की इतक्या मोठ्या शरीरास काम करण्यास मुबलक अन्न न भेटल्यामुळेच त्यांचा मृत्यु होतो. सैद्धांतिकरित्या, पुरेसं अन्न असलेलं, शिकारी प्राण्यांचा वावर नसलेलं एखाद पर्यावरण जर मास्यास भेटलं तर त्याची प्रचंड वाढ होईल.


एक बेलुगा स्टर्जन

चला आता आपण फक्त स्टर्जन मास्याबद्दल बोलूत. Acipenseridae फॅमिलीत येणाऱ्या २७ मास्यांच्या प्रजातींना आपण स्टर्जन म्हणून संबोधतो. २०० दशलक्ष वर्षांपूर्वी ट्रायासिक काळातही आढळणाऱ्या या अतिप्राचीन प्रजातींना लिविंग फोसिल्स म्हणूनही बोललं जातं. स्टर्जनची बरीच चित्तवेधक वैशिष्ट्ये आहेत. पहिलं म्हणजे त्या खूप वर्षं जगतात. नक्की किती ते अजूनही माहिती नाही परंतु १९५३ साली कॅनडा मध्ये पकडलेल्या एक स्टर्जनच वय शास्त्रज्ञांनी १५२ वर्षं इतकं सांगितलं होतं. दुसरं असं की या लांब आयुष्यात त्यांची प्रचंड वाढ होते. आतापर्यंत सर्वात मोठ्या स्टर्जन ची खरिखुरी नोंद ही १८२७ साली वोलगा इसचुरीमध्ये झाली आहे. आश्चर्यकारकरित्या तीचं वजन ३,४६३ पाउंड (१५७० किलो!) इतकं तर लांबी २५ फूट इतकी होती. तिचं वय २०० वर्षं असावं असा अनुमान आहे. दीर्घ काळापासून ३० फुटांपेक्षा लांब स्टर्जनच्याही रिपोर्ट्स आल्या आहेत परंतु त्यांची पुष्टी अजून झालेली नाही. ही गोष्ट अशक्य असेल असे वाटत नाही. आता याचाच एक क्षणभर विचार करा. हा मासा एक स्कुल बस पेक्षाही लांबलचक आहे त्याच वजन जवळ जवळ दोन टन इतकं आहे. हायलँड च्या शांत लॉक मध्ये असल्या प्रकारचा मासा खरोखर राक्षसंच वाटेल.


ही स्टर्जन ब्रिटिश कोलंबियात पकडली गेली होती. ती आठ फूट लांब आणि ८०० ते १००० पाऊंड इतक्या वजनाची आहे. आता यापेक्षा तीन पटींनी लांब आणि चार पटींनी वजनदार स्टर्जन डोळ्यासमोर आणा. राक्षस दिसते? मला उत्तर होय असे वाटते. 

स्टर्जनच्या बऱ्याचश्या प्रजाती ऍनाड्रोमस आहेत, त्या पहिली वीस वर्षे पुर्णपणे समुद्रात राहतात व त्यानंतर त्या अंडे देण्यासाठी गोड्या पाण्याकडे प्रवास करतात (नेस नदीतून नॉर्थ सी ते लॉक नेस प्रवास करणाऱ्या सॅलामन मास्यांसारखंच). बऱ्याच स्टर्जनना एक व्यापक पृष्ठभाग असतो ज्याच्यातून उभार निघून एक शिखर तयार होतं. उत्तर अमेरिका व कॅनडातील लॉक नेस सारखंच वातावरण असलेल्या तलावांत मोठ्या स्टर्जन (९-१० फूट)  पकडल्या आहेत. वॉशिंग्टन स्टेट मधील वॉशिंग्टन तलावात बदकं खाणारा एक मोठा राक्षस आहे असं बोललं जायचं. १९८७ साली एक अर्धा टन पेक्षा जास्त वजन असलेली, ११ फुटी स्टर्जन जेव्हा या तलावाच्या किनाऱ्यावर मृत अवस्थेत सापडली तेव्हा या राक्षसाच्या घटनाही थांबल्या. कॅलफ्रॉनिअतील, नोवाटो जवळील स्टॅफोर्ड तलावातही बऱ्याच राक्षस घटनांची नोंद झाली होती. १९८४ मध्ये डॅम च्या दुरुस्तीसाठी तलावाचा पूर्णपणे निचरा करण्यात आला आणि शेवटी राक्षस मिळाला - एक सहा फुटी स्टर्जन.

लॉक नेस मध्येही एखादी मोठी स्टर्जन असेल का? याची शक्यता आहे परंतु लॉक मध्ये असला मासा पकडल्याच्या कोणत्याही रिपोर्ट्स नाहीत. चला मनातल्या मनात विचार करूयात की एखादी स्टर्जन १८५० सालाच्या आसपास नेस नदीतून लॉक नेस मध्ये घुसली. ही एखादी बाल्टिक स्टर्जन किंवा जवळजवळ विलुप्त झालेली युरोपिअन लेक स्टर्जनही असू शकते. कोणत्याही प्रकारची असो, ती स्टर्जन त्या वेळी कमीत कमी २० वर्षं वयाची असेल जेव्हा ती अंडे देण्यासाठी जागा शोधत असेल. आता असं मानुयात की काही कारणास्तव तिला लॉक सोडायला जमलं नाही व ती तेथेच राहिली. याच काळात घडलेल्या "मॉन्स्टर फिश" घटनांशी तिचा संबंध असू शकतो. आपल्याला हे माहिती आहे की स्टर्जन १५० वर्षं किंवा त्याही पेक्षा जास्त वर्षं (सर्वात मोठी स्टर्जन २०० वर्षांची असल्याची नोंद आहे) जगू शकते.  तर आता हीच स्टर्जन ( काळानुसार आणखी वाढलेली) १९३३ ते १९८० मधल्या घटनांसाठी जबाबदार असू शकते. हीच स्टर्जन आजही लॉकमध्ये जिवंत असू शकते!

या थिअरिला आधार देणारे पुरावे आपल्याकडे आहेत का? लक्षात घ्यायला पहिला प्रश्न असा की एखादी स्टर्जन नेस नदीवरील दोन बांध पार करून येऊ शकते का? याच उत्तर होय असं आहे. कॅनडातील काही ठिकाणी जेथे नदी व तलाव यांत फक्त बांध हाच एक मार्ग आहे अश्या वेळेसही स्टर्जन तलावांत सापडली आहे. नेस नदीवरील दोन्ही बंधाऱ्यांत सॅलामन मास्यांसाठी "फिश गॅप्स" काढलेले आहेत. यातील होल्म मिल्स बांध हा ६० फूट रुंद तर डॉचफोर बांध हा २४ फूट रुंद आहे. जेव्हा पाणी जास्त असतं तेव्हा होल्म मिल्स बांध पाच फूट तर डॉचफोर बांध सात फूट खोल भरतो.  प्रचंड मोठ्या मास्यालाही दोन्ही बंधारे पार करण्यास इतकं पाणी पुरेसं आहे. कधीकधी याच पाण्यातून काही सिलही लॉकमध्ये येतात व त्यांच्याबरोबरच "मॉन्स्टर दिसण्याच्या" नव्या घटनांमध्ये वाढही होते.


मिशिगन तलावात पकडलेली एक मोठी स्टर्जन

तर, एक मोठी स्टर्जन नेस नदीमधून लॉक मध्ये येणे शक्य आहे असेच वाटते पण या नदीमध्ये कधी स्टर्जन दिसली आहे का? ती १९३२ सालातील एका पूलावरून नदीत "मगरीसारखा भासणारा वेगळाच प्राणी" दिसण्याची घटना लक्षात आहे? प्रत्यक्षदर्शीने या प्राण्याचे वर्णन "छोटी मान, मोठं नाक, पाठीवर मोठे खवले किंवा प्लेट आणि डोक्याच्या दोन्ही बाजूस सुळे" असं केलं आहे. एका स्टर्जन ची सगळ्यात महत्वपूर्ण ओळख म्हणजे तिच्या पाठीवरील खवले,  बऱ्याच प्रजातीत मोठं नाकही असतं आणि जवळपास सगळ्याच स्टर्जन प्रजातीत तोंडाजवळ दोन्ही बाजूस बार्बेल नावाची लांब ज्ञानेंद्रियही आहेत जी सुळ्यांसारखी भासतात आणि नदीतील ही वेगळी वस्तू आता अचानक स्टर्जन वाटू लागते. मी स्वतः १९९१ मध्ये मी स्वतः जे काही पाहिलं ते इतकं तपशीलवार जरी नसलं तरी ती प्रवाहात पुढे चाललेल्या स्टर्जनची पाठ असू शकते. 

आता आणखी दोन घटनांचा विचार करू. १९३६ साली अलस्टेर डल्लास या लँडस्केप आर्टिस्टने लोचच्या किनाऱ्यावर प्रचंड मोठा (३० फुटांच्या आसपास) प्राणी पाहिल्याचा दावा केला. त्याने काढलेल्या स्केच मध्ये एक वेगळाच परंतु मास्यासारखाच दिसणारा प्राणी होता. या प्राण्याच्या पाठीवर कुबड होतं, लांबलचक शोषणारे नाक होतं ज्याच्या आसपास काही अवयव बाहेर आले होते. एखाद्या स्टर्जन सारखंच! १९३३ मध्ये फोर्ट ऑगस्ट्स जवळ एका स्त्रीला पाण्यात काहीतरी तरंगताना दिसलं. आधी तिला तो लाकडाचा ओंडका वाटला परंतु त्याला पोहुन तरंग तयार करताना पाहून ती आश्चर्यचकित झाली. हीच वस्तू नंतर पाण्याखाली गेली. त्या वस्तूचा आकार व तिच्यावरील खपल्यांमुळे तीला ती झाडाची फांदी वाटली. जेव्हा तीला स्टर्जनच्या पाठीवरील बोनी प्लेट्स ची छायाचित्रे दाखवली तेव्हा तिने असेच काहीतरी पाण्यात पाहिल्याचे सांगितले.

या भागात स्टर्जन आहेत का? येथे त्या असामान्य आहेत परंतु अनोळखी मुळीच नाहीत. ऑगस्ट १९६१ मध्ये इन्व्हरनेस पासून लांब नसलेल्या मोरेय फर्थ येथे एका १२ फुटी स्टर्जन ची नोंद झाली होती. १८७१ साली इन्व्हरनेस कुरिअर या वृत्तपत्रात नेस नदीच्या मुखाबाहेर, सॅलामन मास्याच्या जाळ्यात एका ७ फुटाच्या स्टर्जन मास्याला पकडल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती.  याच बातमीत या भागात १८३६ मध्येही एक मोठी स्टर्जन पकडली होती असे नमूद केले होते. यावरून या भागात स्टर्जन नक्कीच वावरतात असे समजते परंतु माझ्या माहितीनुसार लॉक नेसमध्ये अजूनतरी कोणीही स्टर्जन पकडली नाहीये. 

जर लॉक मध्ये एखादी प्रचंड स्टर्जन असती तर येथे होण्याऱ्या मॉन्स्टर साईटिंग्स ना तीच जबाबदार असती का? एखाद्या डोकं आणि मान असलेल्या घटनेसाठी मी स्टर्जनला जबाबदार नाही धरू शकत परंतु आधी बोलल्याप्रमाणे मला डोकं व मान याचं संशयास्पद नसलेलं एकही छायाचित्र माहिती नाही. मोठं कुबड दिसलेल्या घटनांसाठी स्टर्जन नक्कीच जबाबदार ठरू शकते. स्टर्जन या बॉटम फिडर प्राणी आहेत ज्या जीवनातील बराच भाग खोल पाण्यात व्यतीत करतात. तरीही त्या थोड्या वेळासाठी उथळ पाण्यात किंवा पाण्याच्या पृष्ठभागावर अथवा थोडं खालीही येतात हेही खरं आहे. यामागील कारण अजून कळलेले नाही परंतु काही "उलटलेली बोट" प्रकारच्या घटनांसाठी आपण पाण्याच्या पृष्ठभागावर पाठ बाहेर काढून फिरणाऱ्या स्टर्जनला जबाबदार ठरवू शकतो असे मला वाटते. १९९४ साली उर्कहार्ट बे मध्ये माझ्या मैत्रिणीने पाहिलेल्या वस्तुस एक प्रचंड मोठी स्टर्जन नक्कीच कारणीभूत असू शकते. 


एक लेक स्टर्जन

ह्यू ग्रे चं छायाचित्रही सरळ करून पाहिल्यास स्टर्जन दाखवतं का? हे जरा अनिश्चितच आहे. पाठीवरील शिखर उघड दिसतंय आणि डोर्सल फिन ज्याला म्हणू शकतो असा भाग उजव्या बाजूस दिसतो (जेव्हा छायाचित्र आपण बरोबर सरळ करून पाहतो तेव्हा). तरीही, डावीकडुन बाहेर निघालेलं कुबड अवघडच वाटतंय. मी असे मानेन की एखादी स्टर्जन तिच्या लांब तोंडाचा वापर करून तळावर काहीतरी खाते आहे आणि तिचं शरीर पाण्यावर तरंगतं आहे ज्यामुळे अशा प्रकारचा आकार तयार होतो आहे.  परंतु ग्रे च्या छायाचित्रातील वस्तूची बाजू आणि पाठ खूपच गुळगुळीत दिसते आहे - स्टर्जनवर असतात असे कोणत्याही प्रकारचे बोनी प्लेट्स नाहीत इथे नाहीत.

१९३३ साली लॉक नेस मध्ये चुकून वाचलेले एक किंवा अनेक डाइनोसॉर ठाण मांडून आहेत या कल्पनेतून लॉक नेस संबंधी असलेली बरीचशी अतिशयोक्ती व उत्साह तयार झाला असे मला वाटते. ही बरीच रोमँटिक कल्पना आहे जिने ताबडतोब लोकांच्या कल्पकतेला पकडले. दुर्दैवाने या थिअरिस दुजोरा देणारा एकही पुरावा नाही आणि या गोष्टीस शंकेने पाहण्यासाठी बरीच कारणंही आहेत. यामुळे एखादा लांब मानेचा प्रचंड मोठा प्राणी किंवा प्राण्यांचा समूह लॉक नेस मध्ये राहतो ही माध्यमांनी प्रचार-प्रसार केलेली एक हास्यास्पद कल्पना असून इतर काही नाही असे आपण ठामपणे बोलू शकतो. यावरून मला १९३३ च्या आधीच्या काळात पसरलेली आणि वर्षानुवर्षे स्थानिकांच्या मनात रुजलेली लॉक नेस एका प्रचंड मोठ्या मास्याच घर आहे अशी गोष्ट आठवली. मला असे वाटते की स्टर्जन मासा हाच यास सर्वोत्तम उमेदवार ठरतो. लॉक मध्ये राहिलेला एक एकटा स्टर्जन मासा किंवा लॉक मध्ये वेळोवेळी संचार करणारे व नंतर निघून जाणारे अनेक स्टर्जन मासे याचे कारण असू शकतात. 

लॉक मध्ये राहिल्यास एक मोठा स्टर्जन मासा नक्कीच राक्षस म्हणण्यास पात्र ठरू शकतो असे मला वाटते. त्याचबरोबर तो आजवर आलेल्या कुबड आणि पाण्यातील गडबड असल्या विश्वसनीय नोंदणींसाठीही कारणीभुत ठरू शकतो. खेदाने, "लॉक नेस मधील मोठा मासा" ही कल्पना कधीच इतके फ्रीज मॅग्नेट विकू शकणार नाही हे मला माहिती आहे परंतु जर आपण आपल्याकडे असलेल्या पुराव्यांकडे तार्किक बुद्धीने पाहिले तर लॉक नेसच्या रहस्याचे हेच स्पष्टीकरण असेल असे मला वाटते.

  • या विषयाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी:

The Loch Ness Story, 1975, by Nicholas Witchell.

पत्रकार, BBC न्यूज डिप्लोमॅट आणि रॉयल करस्पॉन्डन्ट निक विचेल यांच पस्तीस वर्षांपूर्वी प्रकाशित झालेलं हे पुस्तक अजूनही लॉक नेस मॉन्स्टर संबंधी सर्वोत्तम आणि सगळ्यात बॅलेन्सड पुस्तक वाटत. हे आता छपाईत नाही परंतु त्याची एखादी प्रत मिळणे इतके कठीणही नाही. 


The Loch Ness Monster: the Evidence, 1997, by Steuart Campbell.

जर तुम्हाला बॅलन्सच हवा असेल तर एका लॉक नेस मॉन्स्टर डीबंकर ने लिहिलेलं हे पुस्तक उत्तम आहे. लॉक नेस मध्ये असाधारण असं काहीही नाहीये या पूर्वपदाने कॅम्पबेल आपल्या पुस्तकाची सुरुवात करतात आणि पुढील १३० पानं असं का हे स्पष्ट करण्यात घालवतात (पण ते कोणतीही नेस्सी घटना स्पष्ट करत नाहीत व कोणत्याही प्रत्यक्षदर्शींच्या मुलाखतही घेत नाहीत). ते "लॉक नेस मॉन्स्टर"(कारण स्कॉटिश नसलेली लोकं "Loch" या शब्दाचा गैर उच्चार करतात) किंवा नेस्सी (खूपच हलका शब्द) यांचा वापर करणे टाळतात आणि यामुळे पूर्ण पुस्तकात ते या सगळ्यांस "LNM" असंच संबोधतात. या पुस्तकात काही नवं किंवा धक्कादायक असे काहीही नाही परंतु हे एक चांगलं पुस्तक आहे. 


The Legend of Nessie

स्वतःला “the Ultimate and Official Loch Ness Monster site” असं म्हणवून घेणारी वेबसाईट; त्याच्या अर्थ बनवणाऱ्यालाच माहिती. यावर "लेटेस्ट साईटिंग्स" च्या नोंदी केल्या जातात ( तरी शेवटची नोंद २०११ तील) आणि एक लाईव्ह वेबकॅमही इथे आहे (जो मुख्यत्वे लॉकच्या बाजूने जाणाऱ्या रस्त्यावरील भागातील दृश्य दाखवतो) याचबरोबर काही भूतकाळातील साईटिंग्स बद्दल माहितीही येथे आहे.  


The Official Loch Ness Sightings Register

आणखी एक "ऑफिशिअल" वेबसाईट जी साईटिंग्सचे रेकॉर्डस्, फोटोग्राफ्स आणि फिल्म्स पुरवते. धक्कादायक असे काहीही नाही पण तुम्हाला स्वतःला या विषयाबद्दल अजून जाणून घ्यायचं असेल तर चांगली माहिती येथे उप्लब्ध आहे. 


Author 

Steve MacGregor
 

स्टिव्ह मॅकग्रेगर (Steve MacGregor) हे UK बॉर्न इंग्लिश लेखक आहेत. ते इतिहास, रहस्य आणि गुन्ह्यांशी संबंधित लेख व पुस्तकं लिहितात. तुम्ही त्यांची पुस्तकं ऍमेझॉन वर विकत घेऊ शकता. 


ह्या लेखाबद्दल जे काही मत असेल ते कमेंट मध्ये कळवा आणि नव्या गूढ रहस्य संबंधित लेखांसाठी साईट ला भेट देत रहा. 

माझे लेख आवडत असतील व पुढील लेखांसाठी मला सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर माझ्या ऍमेझॉन अफिलिएट लिंक्स वरून शॉपिंग करा. 

ऍमेझॉन अफिलिएट लिंक
↓↓↓↓↓↓↓

अजून रहस्य लेखांसाठी वेबसाईटला भेट देत रहा. तुम्हाला कोणत्या रहस्याबद्दल लेख हवा असल्यास कंमेंट बॉक्स मध्ये तसं कळवा. 

तोपर्यंत माझ्या YouTube Channel ला भेट देऊन वेगवेगळ्या पुस्तकांबद्दल जाणून घ्या!


Comments

Popular Posts

कोसला समीक्षा अणि विश्लेषण || Kosla Book Review & Analysis

Why you need to watch Asur? || Asur Webseries Review

दयातलोव पास चे रहस्य || Dyatlov Pass Incident in Marathi